घोडावत विद्यापीठात टेडेक्स (TEDx) उपक्रमाचे आयोजन



अतिग्रे / शिवार न्यूज नेटवर्क :

संजय घोडावत विद्यापीठात 11 नोव्हेंबरला विद्यार्थ्यांसाठी 'आत्मविश्वास, नवचैतन्य आणि भविष्यातील संधी' या विषयावर प्रेरणादायी टेडेक्स (TEDx) उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी कृत्रिम बुद्धिमत्ता कायदेविषयक तज्ञ साक्षर दुग्गल, ईवॉलविंग एक्स चे कार्यकारी व्यवस्थापक अमोल निटवे, सोशल सिंफनीचे संस्थापक नीरज वैद्य, रोबोटिक्स इंजिनीयर शौर्य भासिन, स्पेन देशातील पीपल संस्थेच्या संचालिका साथ्या ल्लूल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.

       तज्ञांकडून विद्यार्थ्यांना जागतिक पातळीवरील संधी, समाजातील बदल आणि तंत्रज्ञानाच्या प्रभाव, शाश्वत विकासाचे महत्व याविषयी मार्गदर्शन मिळणार आहे. तसेच वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनातील आव्हानांशी सामना करण्यासाठी प्रोत्साहन आणि प्रेरणा मिळणार आहे. या उपक्रमाचा उद्देशच विद्यार्थ्यांच्या विचारशक्तीला चालना देणे, नवीन दृष्टिकोन विकसित करून प्रेरणा देणे हा आहे. 


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष