श्री वृषभाचल नांदणी पंचकल्याण महोत्सव यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी प्रशासनाने नियोजन करावे : आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या सूचना



कोल्हापूर / शिवार न्यूज नेटवर्क :

श्री अतिशय क्षेत्र वृषभाचल नांदणी येथे दि. १ ते ९ जानेवारी २०२५ या कालावधीत होणाऱ्या पंचकल्याणक व ३१ फूट उंच आदिनाथ तीर्थंकर बृहन्मूर्तीच्या महामस्तकाभिषेक महोत्सवासाठीच्या तयारीला वेग आला आहे. या अनुषंगाने प्रशासनाची बैठक आयोजित करण्यात होती या बैठकीत शिरोळ तालुक्याचे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी महोत्सव यशस्वी करण्यासाठी प्रशासनाला सूचना दिल्या आहेत.

श्री वृषभाचल नांदणी हे दिगंबर जैन धर्मीयांसाठी पवित्र तीर्थक्षेत्र असून येथे १२ वर्षांनंतर पुन्हा महामस्तकाभिषेकाचा सोहळा होणार आहे. यावेळी पंचकल्याणक प्रतिष्ठापना महोत्सव व नव्याने बांधलेल्या चक्रेश्वरी देवी मंदिरातील मूळनायक आदिनाथ तीर्थंकर आणि २१ फूट उंच अरिष्टनिवारक मुनिसुव्रतनाथ तीर्थंकर यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होणार आहे.

या सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे प.पू. राष्ट्रसंत चर्याशिरोमणी आचार्य श्री १०८ विशुद्धसागरजी महाराज यांच्या ससंघ व अनेक आचार्य व भट्टारक स्वामीजींच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडणार आहे. महोत्सवात देशभरातील लाखो भाविक सहभागी होणार असल्याने या धार्मिक कार्यक्रमाला विशेष महत्त्व आहे.

सदर महोत्सवासाठी वाहतूक व्यवस्था, पार्किंगची सुविधा, आरोग्यसेवा, पाणीपुरवठा, वीजपुरवठा आणि सुरक्षेसाठी पोलीस बंदोबस्त अशा विविध व्यवस्थांवर विशेष भर देण्यात येत आहे. प्रशासकीय तयारीचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत प्रभारी जिल्हाधिकारी संजय शिंदे, उपजिल्हाधिकारी संपत खिलारी, उपविभागीय अधिकारी अश्विनी बर्डे - चौगले, तहसीलदार अनिलकुमार हेळकर, गटविकास अधिकारी शंकर कवितके यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

बैठकीत आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी प्रशासनाला महोत्सवाच्या सर्व व्यवस्था सुरळीत पार पाडण्यासाठी योग्य नियोजन करण्याच्या सूचना दिल्या. त्यांनी सांगितले की, "श्री वृषभाचल क्षेत्राचे ऐतिहासिक व धार्मिक महत्त्व लक्षात घेता येथे येणाऱ्या लाखो भाविकांची सोय करण्यात कोणतीही कमतरता राहता कामा नये. वाहतूक व्यवस्थेबाबत विशेष नियोजन करण्यात यावे तसेच आरोग्य व सुविधा देण्यासाठी तातडीने उपाययोजना आखाव्यात, श्री वृषभाचल क्षेत्राच्या अधिपत्याखाली असलेल्या गावांतील श्रावक-श्राविकांसह संपूर्ण भारतातून लाखो भाविक या महोत्सवासाठी हजेरी लावणार आहेत. त्यानुसार, भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय, शौचालय व्यवस्था आणि आपत्कालीन आरोग्य सेवा तत्परतेने उपलब्ध करण्यासाठी संबंधित विभागांना काम करण्याचे निर्देश आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दिले.



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष