तालुक्यातील रस्त्यांच्या विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही : आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर
१० कोटी रुपयांच्या निधीतून औरवाड ते गणेशवाडी रस्त्याच्या कामाचा शुभारंभ
औरवाड / शिवार न्यूज नेटवर्क :
शिरोळ तालुक्यातील दळणवळण मजबूत बनवण्याच्या दृष्टीने कोट्यावधी रुपयांचा निधी खर्च करण्यात येत आहे. प्रामुख्याने शिरोळ तालुका हा कर्नाटक सीमेवर असल्याने मोठ्या प्रमाणात राज्यांतर्गत वाहतूक सुरू असते याचबरोबर तालुक्यातील पर्यटन स्थळ, प्रसिद्ध देवस्थान त्यामुळे मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी लक्षात घेऊन तालुक्यातील रस्ते मजबूत व्हावेत या दृष्टीने यापुढेही शिरोळ तालुक्यातील रस्त्यांच्या विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, असे प्रतिपादन आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी केले.
शिरोळ तालुक्यातील औरवाड - कवठेगुलंद - गणेशवाडी ते राज्यहद्द प्रजिमा २३ ची सुधारणा करणेसाठी १० कोटी रुपयांच्या विकास कामांचे उद्घाटन माजी मंत्री आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी ते बोलत होते.
यावेळी बोलताना आमदार यड्रावकर पुढे म्हणाले, शिरोळ तालुक्यातील नदीपलीकडील सात गावात रस्त्यांची अवस्था वारंवार दयनीय बनते. त्यामुळे या रस्त्यांसाठी भरीव निधीची गरज ओळखून औरवाड ते गणेशवाडी या राज्यहद्द प्रजिमाची सुधारणा करणे अंतर्गत १० कोटींचा निधी या ठिकाणी खर्च करण्यात येणार आहे. त्यामुळे हा रस्ता मजबूत होणार आहे व नदीपलीकडील सात गावातील वाहनधारकांना तसेच ग्रामस्थांना हा रस्ता सोयीचा होणार आहे. यापुढेही तालुक्यातील दळणवळणाच्या विकासासाठी लागेल तेवढा निधी खर्च करणार असल्याचेही त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.
यावेळी प्रशांत अपिने, जयपाल कुंभोजे, दादेपाशा पटेल, सुकुमार किनिंगे, जयपाल उगारे, आलासचे सरपंच सचिन दानोळे, सुरेश शहापुरे, जगन्नाथ जाधव, विद्याधर मरजे, सुधीर शहापुरे, रवींद्र शहापुरे, आदिनाथ आरबाळे, गोविंद कोल्हापुरे, फजलेअली पटेल, आनंदा कुंम्मे, बाबासो पाटील, प्रकाश भेंडवडे, नजप्पा भेंडवडे, प्रमोद भेंडवडे, राजेंद्र जांभळे, गुरुपाद केटगाळे, रावसाहेब गडगडले, रनजीतसिंह शिंदे, राजेंद्र डवरी, अमर शिंदे,महेश जगताप, अशोक जगताप, बाबालाल चिंचवाडकर, अंजुम मुल्ला, अकलाक पटेल, राजेंद्र रावण, अण्णाप्पा मळवाडे, धनपाल खोत, सलीम कोरबु, महावीर तकडे, कल्लाप्पा कांबळे, किरण संकपाळ यांच्यासह पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा