तेरवाड बंधारा मजबूत करणार : आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर
जयसिंगपूर / शिवार न्यूज नेटवर्क :
तेरवाड बंधाऱ्याच्या दुरुस्तीचे काम सुरू झाले आहे. हा बंधारा शेतकरी बांधवांच्या बरोबर नदी काठावरील नागरिकांना वरदान असून या बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी भरीव निधी देऊन हा बंधारा मजबूत करणार असल्याची ग्वाही, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दिली.
तेरवाड बंधारा दुरुस्तीचे काम गेल्या दोन दिवसापासून सुरू आहे. या कामाच्या पाहणीप्रसंगी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर बोलत होते.
तेरवाड बंधाऱ्याच्या दुरुस्तीचे काम २०१७ साली मंजूर झाले होते. त्यावेळी ५३ लाख रुपयांचा निधी मंजूर करून घेऊन निविदा प्रक्रिया पूर्ण झाली होती. मात्र, संबंधित ठेकेदाराने कामाला सुरुवातच केली नसल्याने बंधाऱ्याचे काम प्रलंबित राहिले होते. प्रशासनाने नव्याने निविदा प्रक्रिया राबवून दुसऱ्या ठेकेदाराला काम सोपवले आहे. या निधीतून बंधाऱ्याच्या पाणी अडवणुकीच्या सळखाच, काँक्रिटीकरण, दोन्ही काठांचा भराव आणि संरक्षक कठड्यांच्या दुरुस्ती करण्यात येणार येत आहे.
आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी तेरवाड बंधाऱ्याची आज पाहणी केली व बंधाऱ्याच्या मजबुतीसाठी भरीव निधी देण्याची ग्वाही यावेळी दिली. यावेळी पाटबंधारे विभागाचे अधिकारी यांच्यासह प्रकाश पाटील टाकवडेकर, युवराज पाटील, शरद आलासे, रमेश भुजूगडे आदी उपस्थित होते.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा