मोहसीन जमादार यांचा गणपतराव पाटील यांच्या हस्ते सत्कार

शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क :

शिरोळ तालुक्यातील हेरवाड येथील सुपुत्र मोहसीन जमादार यांनी ‘पुष्पा २’ या बहुचर्चित सिनेमाचे एडिटिंग करून आपल्या कौशल्याच्या बळावर संपूर्ण देशाचे लक्ष वेधले आहे. त्यांच्या या उल्लेखनीय योगदानासाठी दत्त उद्योग समूहाचे प्रमुख उद्यान पंडीत गणपतराव पाटील यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला.

हा सत्कार सोहळा शिरोळ दत्त कारखान्याच्या कार्यस्थळावर आयोजित करण्यात आला होता. यावेळी मोहसीन जमादार यांच्या कुटुंबीयांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. रफिक जमादार, हिम्मत जमादार, सोहेल जमादार, जावेद जमादार, जमीर मुल्ला आणि युनुस जमादार यांनी या सोहळ्याला विशेष रंगत आणली. मोहसीन यांनी आपल्या मेहनतीने आणि अद्वितीय कौशल्याने शिरोळ तालुक्याचे नाव देशभरात उंचावले आहे.

‘पुष्पा २’ च्या एडिटिंगच्या निमित्ताने मोशिन यांनी चित्रपटसृष्टीत आपला ठसा उमटवला असून त्यांच्या कार्यामुळे अनेक तरुणांना प्रेरणा मिळत आहे. दत्त उद्योग समूहाच्या वतीने त्यांचा सन्मान करून त्यांचे कौतुक करण्यात आले. शिरोळ तालुक्यातील कलाकारांना मोठ्या व्यासपीठावर आपली ओळख निर्माण करण्यासाठी मोहसीन यांचा आदर्श घेतला जाईल, अशी भावना व्यक्त करण्यात आली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष