चिदानंद बसप्रभू कोरे सहकारी साखर कारखान्याच्या वतीने ऊसतोड मजूरांच्या मुलांसाठी तंबू शाळा सुरू

अमर माने / शिवार न्यूज नेटवर्क :

     नणदी येथील चिदानंद बसप्रभू कोरे सहकारी साखर कारखाना आणि कर्नाटक शासनाच्या शिक्षण विभागाचे क्षेत्रीय शिक्षण अधिकारी कार्यालय चिक्कोडी आणि क्षेत्र समन्वयक कार्यालय चिक्कोडी यांच्यावतीने महाराष्ट्रातील बीड, जालना, परभणी जिल्ह्यातून ऊस तोडणी व वाहतूक करण्यासाठी आलेल्या मजूरांची मुले शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी अध्यक्ष मल्लिकार्जुन कोरे यांच्या मार्गदर्शनाखाली कारखाना परिसरात तंबू शाळा चालवण्यात आली.

   यावेळी कारखान्याचे महाव्यवस्थापक एन.एस.हिरेमठ यांनी भाषण केले व ऊस तोडणीसाठी आलेल्या मजूरांची मुले शिक्षणापासून वंचित राहू नयेत व प्रत्येक मुलाला शिक्षण मिळाले पाहिजे असे सांगितले. तसेच कारखान्यातील मुलांना लागणारा पोषण आहार, दुपारचे जेवण, पाठ्यपुस्तके, वह्या, पेन व इतर साहित्य शिक्षण विभागातर्फे देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

   यावेळी क्षेत्रीय समन्वयक आय एस इक्कलमार, सीआरपी चिक्कोडी मराठी विभागचे एस.एम.माने, जी एस कांबळे, पीडी मजलट्टी, गंगा शुगर स्कूलचे शिक्षक व्ही.एन.रावणगोळ, शाळेचे शिक्षक एस.एस.कोळी, पी.एम.ठोंबरे, जी.एम.धर्मोजे आणि कारखान्याचे अधिकारी अनिल शेट्टी माळी, सुभाष खोत, तात्यासाब मत्तीवडे, उदय कागले, बीड जिल्ह्यातील ऊस मक्तेदार व त्यांची मुले उपस्थित होती. प्रतिनिधी अमर माने मलिकवाड.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष