भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा ९९ वा वर्धापन दिन साजरा
हैदरअली मुजावर / शिवार न्यूज नेटवर्क :
भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या स्थापनेला ९९ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल इचलकरंजी येथे पक्षाचा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.कॉ.लक्ष्मण चव्हाण यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले.पक्षाचे ध्येय, धोरण,तत्व, पक्षाच्या कार्यकर्त्यांचे योगदान याबाबत कॉ.हनुमंत लोहार,कॉ.महेश लोहार,कॉ.दादासो जगदाळे यांनी विचार व्यक्त केले.कामगार, कष्टकरी, शेतकरी जनतेच्या मूलभूत प्रश्नावर लढणारा पक्ष म्हणून भारतीय कम्युनिस्ट पक्षाची ओळख निर्माण झाली आहे. यावेळी दादू मधून, सदाशिव कोगले, रवींद्र मिस्त्री, मीना भोरे, लक्ष्मण पवार, हैदरअली मुजावर, राजू पांगरे, बाळासो चौगुले, शिवा कोळी, उर्मिला माने, मंगल तावरे आदी उपस्थित होते.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा