हेरवाड मधील पाणीपुरवठा ठप्प

हेरवाड / शिवार न्यूज नेटवर्क :

घोसरवाड नदीकडून येणारी मेन पाईप लाईन लिकेज झाली असल्याने हेरवाड गावचा पाणीपुरवठा ठप्प झाला आहे. ग्रामपंचायतीने ग्रामस्थांची गरज ओळखून गावातील ठिकठिकाणी मारण्यात आलेल्या बोरच्या माध्यमातून पाण्याचा पुरवठा सुरू केल्याने थोडा दिलासा मिळाला आहे. मात्र सदरचे पिण्यास वापरू नये अशा सूचना देखील ग्रामपंचायत ने ग्रामस्थांना केल्या आहेत. लिकेज काढण्यासाठी विलंब लागणार असल्याने सुमारे ४ ते ५ दिवस हेरवाडचा पाणीपुरवठा बंद राहण्याची शक्यता आहे. दरम्यान पाणीपुरवठा योजना सुरू झाल्यापासून म्हणायच्या टॉकीतील गाळ काढण्यात आले नव्हते याची दखल घेऊन लिकेज काढून पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी लागणारा विलंब लक्षात घेता ग्रामपंचायतीने पाण्याच्या टाकीतील गाळ काढण्याचे काम हाती घेतले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष