भारतीय सैन्य हे आपल्या देशाची खरी संपत्ती : आमदार शशिकला जोल्ले
अजित कांबळे / शिवार न्यूज नेटवर्क :
निपाणी सह परिसरातील विद्यार्थी आपले आयुष्य उज्ज्वल बनविण्यासाठी कठोर परिश्रम घेऊन भारतीय सैन्य दलात दाखल झाले आहेत. त्याकारण जोल्ले ग्रुपच्या वतीने निपाणी येथील श्री हाल सिद्ध नाथ सहकारी साखर कारखाना परिसरात तालुक्यातील नव्याने भारतीय सैन्यदलात भरती झालेले (ARMY, NAVY, AIRFORCE, BSF, ITBP, CRPF, CISF, & Others) अशा 110 युवक युवतींचा माजी मंत्री आणि निपाणी मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार सौ. शशिकला जोल्ले वाहिनि या गुणी विद्यार्थ्यांच सत्कार करून, भारतीय सैन्यात सेवा देणाऱ्या सैनिकांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी बोलतांना आमदार सौ शशिकला जोल्ले म्हणाले की आजचे सैनिक ही आपल्या देशाची खरी संपत्ती आहे, जसे आपला शेतकरी कष्टातून देशाला अन्न देतोत्यामूळे तो आपल्या हृदयासारखा वाटतो,. तसेच देश रक्षण करणारा सैनिक आपल्या हृदयाच्या ठोक्याप्रमाणे सेवा बजावत असतो ,या दोघांशिवाय आपण जगू शकत नाही. देशाच्या विकासात या दोघांची भूमिका महत्त्वाची आहे. देशाच्या रक्षणासाठी तरुण वयातच सैन्यात भरती होतात ही बाब आमच्यासाठी अभिमानाची आहे. आपला जीव धोक्यात घालून देश रक्षणासाठी महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या या सैनिकांचे आपण सर्व सदैव ऋणी आहोत.
हाल सिद्ध नाथ साखर कारखाना येथे नवोदित भारतीय सैन्य दलात निवड झालेल्या जवानांचा सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.यामध्ये निपाणी परिसरातील 110 निवड झालेल्या जवानांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ,अर्थसहाय्य देऊन गौरविण्यात आले. यावेळी सत्कार मुर्तीनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
यावेळी माजी मंत्री व आमदार सौ शशिकला अण्णासाहेब जोल्ले,निपाणी नगराधक्ष्या सौ सोनलताई कोठडीया, हातकणंगले मतदारसंघाचे नूतन आमदार श्री अशोकराव माने, जयसिंगपूर नगरपालिकेच्या नगरध्यक्षा सौ. नीता माने, हालसिध्दनाथ साखर कारखान्याचे उपाध्यक्ष पवन पाटील,सर्व संचालक मंडळ, नगरपालिकेचे सदस्य, स्थानिक नेते आणि कार्यकर्ते विद्यार्थी, पालक मोठ्या प्रमाणात उपस्थीत होते.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा