महाराष्ट्रसह कर्नाटकात शरद स्कॉलर परिक्षा संपन्न

४० केंद्रावर ३२९० विद्यार्थ्यांचा सहभाग : प्रथम येणा-यास लाख रुपयांचे बक्षिस

यड्राव / शिवार न्यूज नेटवर्क :

 यड्राव येथील शरद इन्स्टिट्युट ऑफ टेक्ऩॉलॉजीकडून राज्यातील १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी 'शरद स्कॉलर' परिक्षा महाराष्ट्र-कर्नाटकात एकूण ४० केंद्रावर संपन्न झाल्या. शरद इन्स्टिट्युटने सुरु केलेल्या उपक्रमास राज्याभरातून ३२९० विद्यार्थ्यांनी उत्स्फुर्त सहभाग नोंदवला. 

या परिक्षेत विजेत्या ठरणा-या विद्यार्थ्यांना लाखो रुपयांचे बक्षिस संस्थेकडून देण्यात येणार आहे. महाराष्ट्रासह कर्नाटकातील विद्यार्थ्यांची कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी, पुणे, बेळगांव या जिल्ह्यातील ४० विविध केंद्रांवर नियोजनबध्द परिक्षा पार पडल्या. या परिक्षेचा निकाल मे महिन्यात जाहीर होणार आहे. 

बारावीच्या विद्यार्थ्यांना एमएच सीईटीच्या परिक्षेचा सराव व्हावा. तसेच मॅथ्स, फिजिक्स व केमिस्ट्री या विषयामध्ये अधिक ज्ञान अवगत व्हावे. या परिक्षेच्या सरावातून मुख्य सिईटी परिक्षेत गुण मिळावेत अशा दृष्टीने संस्था प्रत्येकवर्षा ह्या स्पर्धा घेतल्या जातात. 

यामध्ये प्रथम येणा-या विद्यार्थ्याला १ लाख रुपयांसह अनुक्रमे ५० हजार, ४० हजार, ३० हजार व २० हजार रुपये बक्षिसे व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. तसेच प्रत्येक जिल्ह्यातील प्रथम विद्यार्थ्यास १० हजार रुपये व इतर बक्षिसे आहेत. 


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष