तेरवाडच्या पौर्णिमा संतोष गोंधळी यांची बिनविरोध निवड
कुरुंदवाड / शिवार न्यूज नेटवर्क :
तेरवाड (ता. शिरोळ) येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी पौर्णिमा संतोष गोंधळी यांची बिनविरोध निवड झाली. निवड सभेच्या अध्यक्षस्थानी मंडल अधिकारी अमितकुमार पडळकर होते. निवडीनंतर गोंधळी समर्थकांनी गुलालाची उधळण व फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष केला.
येथील ग्रामपंचायतीवर संजय आनुसे, सदाशिव माळी, रामचंद्र चव्हाण यांच्या मंगरायासिद्ध आघाडीची सत्ता आहे. सरपंच पद सर्वसाधारण गटासाठी खुला असल्याने व आघाडीच्या नेत्यांनी आघाडीतील सर्वच महीला सदस्यांना कालावधी ठरवून संधी देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार सरपंच हर्षवर्धना भुयेकर यांचा कार्यकाल संपल्याने रिक्त पदासाठी निवडणूक लागली होती.
सरपंचपदासाठी पौर्णिमा गोंधळी यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी अमितकुमार पडळकर यांनी केली.
यावेळी उपसरपंच विजय गायकवाड, सदस्य संजय अनुसे, जालिंदर शांडगे, हर्षवर्धन भुयेकर, शशिकला वाडीकर, सुगंधा वडर, , लक्ष्मीबाई तराळ, ग्रामसेवक महालिंग अकिवाटे, तलाठी एस एस कारंडे यांच्यासह मंगरायासिद्ध आघाडीचे कार्यकर्ते नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान नूतन सरपंच पौर्णिमा गोंधळी यांना शुभेच्छा देण्यासाठी, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख वैभव उगळे यांची प्रमुख उपस्थित होती , यावेळी आघाडीचे सूर्यकांत पाटील, अरुण नल्ला, संतोष भुयेकर, बाबुराव वडर, उदित कांबळे, पापा पांडव, सुगंध डोंगरे, शशिकांत माने, संग्राम आनुसे, राघू नाईक, परशुराम तराळ,आदी मंगरायसिद्ध आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते .

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा