कोळी कुटुंबियांनी जपली सामाजिक बांधिलकी ; लग्नकार्यात सामाजिक संस्थांना आर्थिक मदत

 


कुरुंदवाड / शिवार न्यूज नेटवर्क : 

  शिरढोण (ता. शिरोळ) येथील सुरेश शंकर कोळी व राजश्री सुरेश कोळी या शिक्षक दांपत्यानी आपल्या मुलीच्या लग्नात शिरोळ व इचलकरंजी परिसरातील सामाजिक संस्थांना आर्थिक मदत देवून लग्न कार्यातूनही 

सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविले आहे. लग्नकार्यात आर्थिक उधळपट्टीला फाटा देत सामाजिक काम करणाऱ्या संस्थांना आर्थिक मदतीचा हात देत समाजासमोर आदर्श ठेवला आहे.

   सुरेश कोळी हे इचलकरंजी येथील गंगामाई गर्ल्स हायस्कूलमध्ये पर्यवेक्षक आहेत तर त्यांच्या पत्नी राजश्री शहरातील आदर्श विद्या मंदीरात शिक्षक म्हणून सेवेत आहेत. शिक्षण क्षेत्रात त्यांच्या ज्ञानदानातील कर्तृत्वातून त्यांना विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहेत.

  त्यांना दोन मुली असून दोन्ही मुली आयटी इंजिनियर्सची पदवी घेऊन मुंबई येथील नामवंत कंपनीत नोकरीस आहेत. मोठी मुलगी स्नेहा हीचा पंढरपूर (जि. सोलापूर) येथील आयटी इंजिनियर ओंकार माने यांच्याशी नुकताच शिरोळ येथील मंगल कार्यालयात विवाह पार पडला. यावेळी राजकीय, सामाजिक, सहकार, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

   सध्या लग्नात नको त्या गोष्टींवर पैशाची उधळपट्टी करत श्रीमंतीचे दर्शन दिले जाते.मात्र कोळी दाम्पत्यांनी आपल्या कष्टाच्या कमाईतील काही रक्कम सामाजिक काम करणाऱ्या सेवाभावी संस्थांना देणगी रुपात देवून समाजासमोर आदर्श ठेवला आहे. त्यांचा हा आदर्शवत उपक्रम घेण्यासारखा आहे.

 यामध्ये संविधान सभागृह समिती, निमशिरगाव, सेवाभारती रुग्णालय (इंचलकरंजी), दुर्वांकूर साखरशाळा (अ. लाट), राष्ट्र सेवा दल (इंचलकरंजी) आणि जानकी वृद्धाश्रम (घोसरवाड) या संस्थांना प्रत्येकी पाच हजार रुपयांची देणगी दत्त साखर कारखाण्याचे माजी अध्यक्ष गणपतराव पाटील, शिरोळचे नगराध्यक्ष अमरसिंह पाटील, शिरढोण येथील जयहिंद सहकारी पाणीपुरवठा संस्थेचे अध्यक्ष दस्तगीर बाणदार यांच्या हस्ते देण्यात आला.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष