बोरगांव येथील गोसावी समाजातील श्री महालक्ष्मी मंदिराच्या जीर्णोधरास साडेतीन लाखाचा निधी मंजूर
अजित कांबळे / शिवार न्यूज नेटवर्क :
कर्नाटक राज्याच्या माजी कॅबिनेट मंत्री, निपाणीच्या लोकप्रिय महिला आमदार सौ शशिकला जोल्ले यांनी सरकारच्या माध्यमातून मजुराई खात्यातून बोरगाव येथील गोसावी समाजातील श्री महालक्ष्मी सेवा संघ मंदिर बांधकाम जीर्णोद्धार साठी साडे तीन लाखाचा शासकीय निधी मंजूर केलेला आहे .
बोरगाव च्या गोसावी समाजातील येथील श्री महालक्ष्मी मंदिराच्या नियोजित जागेवर मंदिराच्या पाया खुदाईचा समारंभ नुकताच संपन्न झाला. प्रारंभी किसन गोसावी या दांपत्य हस्ते जागेची विधिवत पूजा करण्यात आली .यावेळी हालसिद्धनाथ सहकारी साखर कारखान्याचे संचालक व विद्यमान नगरसेवक शरद जंगठे व जितू पाटील व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते कुदळ मारून पाया खुदाई व श्रीफळ वाढविण्यात आले.
बोरगांव भाजपा चे युवा नेते, शरद जंगठे बोलताना म्हणाले आमच्या नेत्या व माजी मंत्री, निपाणी च्या विद्यमान आमदार सौ शशिकला अण्णासाहेब जोल्ले की यांनी निपाणी शहर पाठोपाठ बोरगांव येथे कोट्यवधीचा निधी मंजूर करून शहराचा सर्वांगीण विकास केला आहे, गोसावी समाजाचे अराध्य दैवत श्री महालक्ष्मी मंदिराच्या बांधकाम साठी आम्ही आण्णा वहिनी यांच्या कडे सतत या मागणीचा पाठपुरावा केला असता माजी मंत्री ,विद्यमान आमदार शशिकला जोल्ले व माजी खासदार अण्णासाहेब जोले यांनी मुजराई विभागाचे आराधना योजने तून गोसावी समाजातील श्री महालक्ष्मी मंदिरास साडे तीन लाख रुपये मंजूर केले असल्याचे मत श्री शरद जंगठे यांनी व्यक्त केले.ते बोरगांव येथील गोसावी समाजातील श्री महालक्ष्मी मंदिराच्या पाया खुदाई कार्यक्रम दरम्यान बोलत होते.
या कार्यक्रमास शरद जंगठे,, जितू पाटील, अजित कांबळे,अमित माळी,रमेश पाटील ,राजू लटलटे ,श्रीपाल गोसावी, किसन गोसावी, महिपती खोत ,राजू कुंभार, महादेव, आयिदमाले, बबन रेंदाळे, शंकर गुरव, बिपिन देसाई, विष्णू तोडकर, काकासाहेब वाघमोडे, फिरोज अपराज ,जयपाल अंमंनावरं, अण्णाप्पा चौगुले , पिंटू गोसावी, अनिल गोसावी, सुनील गोसावी, रामा गोसावी, रमेश गोसावी, युवराज गोसावी, शंकर गोसावी, व प्रकाश गोसावी, सह गोसावी समाजातील भक्तगण मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा