इचलकरंजीत शाहू ग्रंथ दिंडी उत्साहात संपन्न
संदीप कोले / शिवार न्यूज नेटवर्क :
इचलकरंजी (ता. हातकणंगले) येथे शाहू महोत्सव -2024 अंतर्गत आयोजित शाहू ग्रंथ दिंडी मोठ्या उत्साहात पार पडली. या दिंडीचे पूजन माजी उपनगराध्यक्ष रविसाहेब रजपुते, ज्येष्ठ नेते प्रमोद बेलेकर आणि माजी नगरसेवक भाऊसो आवळे यांच्या हस्ते करण्यात आले.
मलाबादे चौक (जनता चौक) येथून नाट्यगृह चौकापर्यंत काढण्यात आलेल्या या दिंडीमध्ये विद्यार्थी आणि विद्यार्थिनींचा उत्स्फूर्त सहभाग होता. व्यंकटराव हायस्कूल आणि गंगामाई विद्या मंदिर शाळेच्या विद्यार्थ्यांनी आपल्या सहभागातून ग्रंथाचे महत्त्व आणि शाहू महाराजांच्या विचारांचा प्रसार केला.
शाहू महोत्सवाचे संकल्पक अरुण रंजना कांबळे यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले. दिंडी यशस्वी करण्यासाठी शाहू महोत्सवाच्या सचिव अक्षरा अरुण कांबळे, संतोष कुरळे, गौतम कांबळे, विशाल कांबळे हालगीकर आदींनी परिश्रम घेतले. ग्रंथदिंडीच्या माध्यमातून शाहू महाराजांच्या लोकहितवादी विचारांचा प्रचार-प्रसार करण्याचा उद्देश साध्य झाल्याचे उपस्थितांनी सांगितले.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा