विज्ञान प्रदर्शनात उर्दू खिद्रापूर तालुक्यात द्वितीय, जिल्ह्यासाठी निवड
हैदरअली मुजावर / शिवार न्यूज नेटवर्क :
शिक्षण विभाग पंचायत समिती शिरोळ मार्फत बळवंतराव झेले हायस्कूल जयसिंगपूर येथे 52वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन दिनांक 16 ते 18 डिसेंबर2024 रोजी करण्यात आले होते. यामध्ये उर्दू विद्या मंदिर खिद्रापूर शाळेच्या विद्यार्थीनी अक्सा रियाज जमादार व मिसबाह रमजान घुनके यांनी मुख्याध्यापक व विज्ञान विषय शिक्षक अमानुल्लाह सदरुद्दिन मुल्ला यांच्या मार्गदर्शना खाली कचरा वेचणारी मशीन garbage disposal machine या उपकरणाचे सादरीकरण करून,तालुक्यात द्वितीय क्रमांक संपादन केले बद्दल गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती शिरोळ सौ भारती कोळी मॅडम व ज्येष्ठ विस्तार अधिकारी श्री दीपक कामत साहेब ,विस्तार अधिकारी श्री. अनिल उमासे साहेब व इतर मान्यवरांच्या उपस्थित सन्मान चिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक यांना सन्मानित करण्यात आले.
यासाठी शाळेचे मुख्याध्यापक अमानुल्लाह मुल्ला, शिक्षक नाजिम जमादार ,रिजवानअहमद पटेल, बुशेरा पटेल केंद्रप्रमुख रियाज अहमद चौगले, उर्दू विस्तार अधिकारी श्री मुसा सुतार, विज्ञान विभागप्रमुख व ज्येष्ठ विस्तार अधिकारी,पं स शिरोळ श्री . दीपक कामत विस्तार अधिकारी श्री.अनिल ओमासे, गटशिक्षणाधिकारी पं स शिरोळ सौ. भारती कोळी मॅडम, यांचे मार्गदर्शन लाभले.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा