संविधानाची विटंबना सहन केली जाणार नाही : छत्रपती ग्रुपचे तहसीलदारांना निवेदन

शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क :

परभणी येथे संविधान प्रतिकृतीची विटंबना आणि भीमसैनिक शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांचा संशयित मृत्यू या घटनांचा छत्रपती ग्रुप महाराष्ट्र राज्यच्या वतीने जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला. तसेच शिरोळचे तहसीलदार अनिल कुमार हेळकर यांना निवेदनाद्वारे संबंधितावर कडक कारवाईची मागणी करण्यात आली.

राज्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडत चालल्यावर राज्य शासनाने तात्काळ कठोर लक्ष देऊन दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी या वेळी करण्यात आली. महाराष्ट्र हा बहुजन महापुरुषांच्या विचारधारा जपणारा सुसंस्कृत प्रदेश आहे. त्यामुळे संविधानाची किंवा महापुरुषांची विटंबना कोणत्याही परिस्थितीत सहन केली जाणार नाही, असे मत छत्रपती ग्रुपच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले.

या अनुषंगाने छत्रपती ग्रुपचे प्रमुख प्रमोद दादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निवेदन शिरोळ तहसीलदारांना देण्यात आले. यावेळी प्रदेशाध्यक्ष रोहित मलमे, तालुका प्रमुख संदिप पवार, संपर्कप्रमुख संतोष पाटील, भीमसैनिक अरविंद धरणगुतिकर, अमर चौगुले, कृष्णा होगले व इतर पदाधिकारी उपस्थित होते.





टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष