चिक्कोडी पोलीस ठाण्याचे हवालदार मंजुनाथ सत्तीगेरी यांचा अपघाती मृत्यु
अमर माने / शिवार न्यूज नेटवर्क :
चिक्कोडी पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस हवालदार मंजुनाथ सत्तीगेरी यांचा आज कुडची हुन आपल्या दुचाकी वरून येत असताना रायबाग अंकली रोडवर मोटर सायकलचा अपघात झाला.
या घटनेत चिक्कोडी पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस हवालदार मंजुनाथ सत्तीगेरी (वय २६) यांचा मृत्यू झाला.
मूळचे मलिंगपूरजवळील केसरगोप्पा गावचे रहिवासी असलेले मंजुनाथ हे चिक्कोडी पोलिस ठाण्यात गेल्या ५ वर्षांपासून कार्यरत आहेत. आज कुडची येथून दुचाकीवरून येत असताना रायबाग रोडवरील नंदीकुरळी क्रॉसजवळ दोन दुचाकींमध्ये झालेल्या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा