श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष

 


नृसिंहवाडी / शिवार न्यूज नेटवर्क :

श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथे श्री दत्त जयंतीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात भेसळयुक्त खवा आल्याची चर्चा सुरु आहे. या प्रकारामुळे हजारो भाविकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. विशेषतः अन्न व औषध प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे या प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे.  

भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेता मोठ्या प्रमाणावर खव्याचे वितरण केले जाते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून वितरित होणाऱ्या खव्याच्या दर्जाबाबत चर्चा सुरू आहेत. अन्न व औषध प्रशासनाने वेळेवर कारवाई न केल्याने भाविकांचा संताप वाढत आहे.  

गेल्या वर्षभरात अन्न व औषध प्रशासनातील अनेक अधिकारी लाचलुचपत प्रकरणात अडकले आहेत. त्यामुळे या भेसळ प्रकरणाकडे कोण लक्ष देणार ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. प्रशासनाकडून कोणताही ठोस उपाययोजना केली जात नसल्याने नृसिंहवाडी येथील अनेकजण भेसळ खव्याच्या माध्यमातून तयार केलेली पदार्थ विक्री करण्यासाठी खुलेआम पुढे येत असल्याची चर्चा आहे.  

पत्रकारांनी अन्न औषध प्रशासनाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, संबंधित अधिकाऱ्यांनी कॉल घेण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. भाविकांच्या आरोग्यास धोका निर्माण करणाऱ्या या प्रकारावर तत्काळ उपाययोजना होणे गरजेचे आहे, अन्यथा भाविकांमध्ये असंतोष निर्माण होण्याची शक्यता आहे.

टिप्पण्या

  1. तो खवा प्रशासकीय अधिकाऱ्यांना खायला द्या, पैशाबरोबर बोगस खवा देखील खपवतील 😜

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद