क्रांतीसूर्य फाऊंडेशन कोल्हापूरतर्फे राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार २०२४ दिपक शेवाळे यांना प्रदान



साताप्पा कांबळे / शिवार न्यूज नेटवर्क :

 क्रांतीसूर्य फाऊंडेशन, कोल्हापूरच्या वतीने देण्यात येणारा राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार 2024 दीपक शेवाळे यांना सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला. माजी जिल्हा परिषद सदस्य मा. राजेंद्र पवार (वडार), उद्योजक युवराज कोळी, सौ. मनिषा नाईक, सौ. हर्षदा परिट (महसूल सहाय्यक, मुंबई), संस्थेचे अध्यक्ष विशाल मोरे, उपाध्यक्ष योगेश दाभाडे व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला.

दीपक शेवाळे यांनी आतापर्यंत अनेक सामाजिक उपक्रम यशस्वीरीत्या राबवले आहेत. 2018 पासून "एक दिवस समाजासाठी" या उपक्रमाच्या माध्यमातून आडी येथे दर रविवारी शालेय विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणे, अभ्यासासोबत भौगोलिक व सामाजिक ज्ञान देणे, तसेच योग्य संस्कार घडविण्यासाठी प्रयत्नशील राहणे, यांसारख्या उपक्रमांतून त्यांनी समाजकारणाला दिशा दिली आहे.

गावातील आंबेडकर भवनची स्वच्छता, कोरोना काळात जनजागृती व लोकांच्या मनातील भीती दूर करण्याचे कार्य, संविधान व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर आधारित व्याख्यानांचे आयोजन आणि सामाजिक चळवळींमध्ये सक्रिय सहभाग, ही त्यांची उल्लेखनीय कामगिरी आहे.

गावातील विविध विकासकामांसाठी वेळोवेळी आवाज उठवून त्यांनी समाजहिताची भूमिका घेतली आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत, त्यांना "समाजभूषण" पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

या पुरस्कार सोहळ्याला आडी गावातील रत्नाप्पा वराळे, शंकर भोसले, आनंदा शेवाळे, राहुल भोसले, सुनिल होसमनी, बाळकृष्ण मधाळे, प्रविण शेवाळे, रणजीत शेवाळे, संगीता शेवाळे, ज्योती शेवाळे यांची विशेष उपस्थिती होती.



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष