झोपडपट्टीतील हायस्कूल गरिबांचे विद्यापीठ झाले पाहिजे : अभिनेत्री चंदा बेलेकर

 संदीप कोले / शिवार न्यूज नेटवर्क :

   क्रांती ज्योती हायस्कूल कोल्हापूर चे स्नेहसम्मेलन अभिनेत्री चंदा बेलेकर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले. आपल्या भाषणात त्या म्हणाल्या की भविष्यात क्रांती ज्योती हायस्कूल ची एकादी तरी विध्यार्थीनी अभिनेत्री म्हणून उदयाला येईल, आपल्या भाषणात पुढे म्हणाल्या झोपडपट्टीतील हे हायस्कूल गरिबांचे विद्यापीठ झाले पाहिजे. त्यासाठी धनिक कोल्हापूरकरानी पुढे यावे. 

याप्रसंगी संस्थेचे चेअरमन प्रा. अशोक कांबळे, बालरोग तज्ञ डॉक्टर विजय गावडे, संचालिका सौ अनुराधा मांढरे, सौ अपेक्षा कांबळे, संचालक राहुल मांढरे, संचालक वसंत कांबळे, खटांगळे गावचे सरपंच विश्वास देसाई, प्रभारी मुख्याध्यापक आयुष मांढरे,सामाजिक कार्यकर्ते जे.डी कांबळे सांस्कृतिक प्रमुख यादव सर व भागातील पालक विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.

 


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष