गुगल मॅप चा घोळ ; ऊस वाहतूक करणारी ट्रॅक्टर - ट्रॉली घुसली थेट राजवाड्यात
कुरुंदवाड / शिवार न्यूज नेटवर्क :
येथील राजवाडा परिसरातील संजीवनी स्कूलच्या प्रवेश कमनीचे ट्रॅक्टर ट्रॉलीच्या धडकेमुळे नुकसान झाले आहे. नृसिंहवाडी येथे बाहेरून येणाऱ्या पर्यटकांना कोल्हापूर कडे जाण्याचा मार्ग गुगल मॅपवर चुकीचा दाखवला जातो त्यामुळे वाहनधारकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागतो. दिवसभरामध्ये पाच ते सहा वाहन या चुकीच्या मार्गावर येत असतात. आज गुरुवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास ऊस वाहतुकीचा ट्रॅक्टर ऊस भरण्यासाठी बहिरेवाडी कडे जात होता गुगल मॅपवर चुकीचा रस्ता दाखवल्यामुळे राजवाडा परिसरामध्ये संजीवनी स्कूलच्या दिशेने आला यावेळी प्रवेश कमानीला ट्रॅक्टर ट्रॉलीची धडक लागल्यामुळे ट्रॅक्टर चालकाने ट्रॅक्टर जागेवरच थांबविला या धडकेमुळे संस्थानकालीन ऐतिहासिक कमानीचे नुकसान झाले आहे. ट्रॉलीची धडक जोरात बसल्यामुळे कमानीचे मोठे दगड सुटे झाले आहेत त्यामुळे कमानीला मोठा धोका निर्माण झाला आहे. ट्रॅक्टर ट्रॉली या मार्गावर अडकल्यामुळे येथे असणाऱ्या त्रिवेणी गॅस ऑफिसची वाहतूक खोळंबली. सकाळी साडेआठ वाजता गॅस वाहतूक सुरू केली जाते मात्र ट्रॅक्टर ट्रॉली रस्त्यात अडकल्यामुळे साडेदहा नंतर ही वाहतूक सुरु करण्यात आली. स्थानिक नागरिकांना ये जा करण्यासाठी देखील मोठा अडथळा निर्माण झाला होता. ट्रॅक्टर ट्रॉली काढण्यासाठी सकाळी साडेसहा वाजल्यापासून साडेदहा वाजेपर्यंत कसरत करावी लागली. स्थानिक नागरिकांच्या मदतीने ट्रॅक्टर ट्रॉली व्यवस्थितपणे बाहेर काढण्यात आली. गुगल मॅप च्या चुकीमुळे अनेक वाहनधारकांना दररोज नाहक त्रास सहन करावा लागत आहे त्यामुळे गुगल मॅप वर हा कोल्हापूर कडे जाणारा मार्ग दाखवला जातो तो रद्द करण्यात यावा अशी नागरिकांतन मागणी होत आहे.


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा