सीमा सुरक्षा दलातील निवडीबद्दल कृष्णा चौगुले यांचा आचार्य १०८ शांतीसागर सोसायटीच्या वतीने सत्कार
अजित कांबळे / शिवार न्यूज नेटवर्क :
नुकत्याच जाहीर झालेल्या केंद्र सरकारच्या विविध सैन्य भरतीच्या निवड यादीत बोरगांव ता.निपाणी येथील यंत्रमाग कामगार यांचा मुलगा कृष्णा शांतिनाथ चौगुले या युवकाने सीमा सुरक्षा दलाच्या ( बीएसएफ ) या परीक्षेत घवघवीत यश मिळविल्याने बोरगांव येथील आचार्य श्री 108 शांती सागर को आप क्रेडिट सोसायटीचे वतीने सत्कार करण्यात आला.
बोरगांव येथील सुपुत्र श्री कृष्णा शांतीनाथ चौगुले हा एका यंत्रमाग कामगारांचां मुलगा आहे,गरीब कुटुंबातील या युवकांने मेहनत करून वडिलांचे स्वप्न साकार केले आहे , त्याकारण बोरगाव सह परिसरात त्यांचे गोड कौतुक केले जात आहे. विशेष म्हणजे बीएसएफ मध्ये निवड झालेल्या युवकांचे वडिल यंत्रमाग कामगार आहेत व आई शेत मजूर आहेत.
सैन्य दलामध्ये भरतीचे अर्ज मागविण्यात आले होते. यामध्ये बोरगांव येथील कृष्णा याने यश मिळविले आहे. बोरगाव येथील आचार्य श्री 108 शांतीसागर को आप क्रेडिट क्रेडिट सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष व हाल सहकारी साखर कारखान्याचे संचालक, नगरसेवक ,शरद जंगठे यांच्यावतीने सोसायटीच्या सभागृहामध्ये बोरगाव येथील बीएसएफ मध्ये निवड झालेल्या कृष्णा शांतिनाथ चौगुले यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी नगर सेवक शरद जंगठे, जितू पाटील,भरत पाटील, महावीर पाटील, गुंडा गोरवाडे, अर्जुन हुदेड,भोपाल महाजन,शंकर गुरव, अण्णा चौगुले, राजू लठलठे, मल्लू खोत,सुरेश बेलंके,निलेश पाटील,महादेव चीगरे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अजित कांबळे यांनी केले.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा