जयसिंगपूर येथे घरफोडी; ३ लाखाचा ऐवज लंपास
जयसिंगपूर / शिवार न्यूज नेटवर्क :
येथील गल्ली क्रमांक 18 विजयमाला नगर लक्ष्मी पार्क मधील अजित राजू माळी वय 25 यांच्या राहत्या बंद घराचे कुलूप कडी कोयंडा उचकटून अज्ञात चोरट्याने तीन लाखाचा ऐवज लंपास केल्याची घटना उघडकीस आली. याबाबतची नोंद पोलीस ठाण्यात झाली आहे.
याबाबत जयसिंगपूर पोलीस ठाण्यातून मिळालेली अधिक माहिती अशी, अजित माळी हे गुरुवार 23 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजल्यानंतर 24 जानेवारी सकाळी 7 वाजण्याच्या दरम्यान राहत्या घराला कुलूप लावून बाहेरगावी गेले होते. दरम्यानच्या मुदतीत अज्ञात चोरट्याने बंद घराचे कुलूप कडी कोयंडा उचकटून घरात प्रवेश करून घरातील 25 ग्रॅम वजनाचे दीड लाख रुपये किमतीचे सोन्याचे मिनी गंठण, 10 ग्रॅम वजनाचे सात हजार रुपयेचे मंगळसूत्र, पाच ग्रॅमचे 30 हजार रुपये किमतीचे कानातील टॉप, 10 हजार 500 रुपयांचे देवाचे चांदीचे मुकुट, 14 हजार किमतीचे दोन चांदीचे पैंजण, 10 हजार 500 रुपयाची चांदीची महादेवाची पिंड, साडेतीन हजार रुपयाची चांदीचे पानसुपारी, आणि रोख रक्कम 10 हजार असा एकूण 2 लाख 88 हजार 500 रुपयाचा मुद्देमाल चोरट्याने लंपास केला. याबाबतची फिर्याद माळी यांनी जयसिंगपूर पोलीस ठाण्यात दिली आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा