महाराष्ट्र राज्य शासकीय रेखाकला परीक्षा 2024 निकाल जाहीर

 


हैदरअली मुजावर / शिवार न्यूज नेटवर्क :

महाराष्ट्र राज्य शासकीय रेखाकला परीक्षा (इलिमेंटरी आणि इंटरमिजिएट) 2024 चा निकाल 13 जानेवारी 2025 रोजी दुपारी 1 वाजता ऑनलाइन पद्धतीने जाहीर करण्यात आला. या परीक्षेत रयत शिक्षण संस्थेचे रमजान शेठ बाणदार विद्यालय, शिरढोण याचा निकाल 100% लागला असून, विद्यार्थ्यांनी उत्तम कामगिरी केली आहे.

इलिमेंटरी परीक्षेत विद्यालयातील 49 विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यापैकी 2 विद्यार्थ्यांनी A ग्रेड, 8 विद्यार्थ्यांनी B ग्रेड आणि 39 विद्यार्थ्यांनी C ग्रेड मिळवली.

A ग्रेड प्राप्त विद्यार्थी: 1. कुमारी मनस्वी संदीप सैसाले व 2. कुमारी सेजल बाळासो तेरदाळे तर इंटरमिजिएट परीक्षेसाठी 39 विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यापैकी 8 विद्यार्थ्यांनी B ग्रेड तर 31 विद्यार्थ्यांनी C ग्रेड मिळवली.

या यशासाठी विद्यार्थ्यांसह मार्गदर्शक कलाशिक्षक श्री. डी. आर. पाटील सर यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. व्ही. एम. पाटील, पर्यवेक्षक श्री. एस. एस. पाटील यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

विद्यार्थ्यांच्या या यशामुळे स्थानिक स्कूल कमिटी, शाळा व्यवस्थापन समिती, शाळा व्यवस्थापन व विकास समिती, सल्लागार समिती, आजी-माजी विद्यार्थी संघ, सर्व ग्रामस्थ व पालक यांनी त्यांचे कौतुक केले आहे.



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष