२ फेबुवारीपासून जयसिंगपूरात आचार्य श्री १०८ विद्यासागरजी महामुनीराज यांचा प्रथम समाधी स्मृती महामहोत्सव

 आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांची माहिती 

जयसिंगपूर / शिवार न्यूज नेटवर्क :

संत शिरोमणी आचार्य श्री १०८ विद्यासागरजी महामुनीराज यांच्या प्रथम समाधी स्मृती महामहोत्सवानिमित्त प.पू. अध्यात्म शिरोमणी आचार्य श्री १०८ समयसागरजी महाराज यांच्या पावन आशीर्वादाने प.पू.आचार्य श्री १०८ वर्धमान सागरजी महाराज, प. पू.१०८ चंद्रप्रभसागरजी महाराज, प. पू. मुनीश्री १०८ उत्तमसागरजी महाराज, प. पू. मुनीश्री १०८ कुंथूसागरजी महाराज, प. पू. मुनीश्री १०८ विशालसागरजी महाराज, प. पू. मुनीश्री १०८ धवलसागरजी महाराज, प. पू. मुनीश्री १०८ विदेहसागरजी महाराज,   

प. पू. मुनीश्री १०८ उत्कृष्टसागरजी महाराज यांच्या पावन सानिध्यात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती स्वागताध्यक्ष आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. येथील इंद्रध्वज सभागृह येथे प.पू. मुनिश्री १०८ विशालसागरजी महाराज यांच्या पावन सानिध्यात पत्रकार परिषद संपन्न झाली. यावेळी त्यांनी आचार्य श्री १०८ विद्यासागरजी महामुनीराज यांच्या कार्याचा आढावा घेतला.

या स्मृती महोत्सवा निमित्त येथील सहकार महर्षी स्व. शामराव पाटील यड्रावकर नाट्यगृह येथे रविवारी २ रोजी मुखमाटी महाकाव्य परिसंवाद व चर्चासत्र होणार आहे. सोमवार ३ रोजी इंद्रध्वज सभागृह गल्ली नंबर ४ येथे सुवर्णप्राशन व आयुर्वेदिक आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवार ४ रोजी श्री १००८ आदिनाथ दिगंबर जैन मंदिर या ठिकाणी वकृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवार दि. ५ रोजी सकाळी ८ वाजता ध्वजारोहण, दुपारी १ वाजता १००८ मंडली आचार्य 36 विधान, दुपारी ३.३० वाजता प्रवचन, सायंकाळी ७ वाजता सांस्कृतिक कार्यक्रम व संगीत आरती, रात्री २ वा. ३५. मिनिटांनी आचार्य श्री समाधी समय विश्वशांती जाप्य होणार आहे. हा कार्यक्रम मुख्य सभा मंडप विद्याविहार पाटील मळा येथे होणार आहे. गुरुवार ६ रोजी मुख्य समारंभ होणार आहे. सकाळी ७ वाजता मुनी संघ सानिध्यामध्ये जाप्य, सकाळी ७.३० वाजता अभिषेक शांतीधारा पूजन व ध्वजारोहन, सकाळी ११ वाजता विद्या ग्रुप स्मृती प्रभावना फेरी होणार आहे या कार्यक्रमाचे मंचे संचालन कवी चंद्रसेन जैन हे करणार आहेत. दुपारी १ वाजता मुख्य समारोह होणार असून यावेळी मंगलाचरण, दीप प्रज्वलन, आचार्य श्रीजींचे भव्य संगीतमय पूजन व प्रवचन होणार आहे. याच दिवशी सकाळी १० वाजता मुख्य सभामंडप येथे रक्तदान शिबिराचे ही आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमाचा सर्व श्रावक श्राविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी केले आहे.

यावेळी बा.ब्र. तात्याभैय्याजींनीही कार्यक्रमाची रूपरेषा व नियोजन सांगितले. या पत्रकार परिषदेस मुख्य संयोजक अभय भिलवडे, महिला संयोजिका सौ. भारती पाटील, सहसंयोजक अतिक्रांत पाटील, शांतीविद्याचे पदाधिकारी अभयकुमार बरगाले, किरण सिदनाळे, द्वारपाल भैयाजी, आदिनाथ मादनाईक तसेच कार्यक्रमाचे संयोजन समिती सदस्य सौ. स्वरुपा पाटील यड्रावकर, श्री. सागर मादनाईक, श्री. राजू झेले, श्री. राजगोंडा पाटील, श्री. दादा पाटील चिंचवाडकर, श्री.पप्पू पाटील, श्री. शैलेश चौगुले, श्री. बापूसाहेब हारुगिरे श्री.आर.बी. नकाते, श्री. सुभाष हातगिणे, श्री. आप्पासाहेब रायनाडे, श्री, सुरेश कटारे, श्री. लोहिकांत खोत, श्री. राजेंद्र नांद्रकेर, श्री. सुनिल पाटील मजलेकर, या सर्वांनी एकजुटीने हा कार्यक्रम यशस्वी करण्याचा मनोदय यावेळी व्यक्त केला.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष