कथाकथन स्पर्धेत कु.शर्वरी राजगोंडा पाटील प्रथम
कुरुंदवाड / शिवार न्यूज नेटवर्क :
कुरुंदवाड येथील शतकोत्तरी वर्षाच्या नगरवाचनालय कुरुंदवाडच्या वतीने घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेततील कथाकथन स्पर्धेत येथील कुमार विद्यामंदिर ची विद्यार्थिनी कु. शर्वरी राजगोंडा पाटील हिने प्रथम क्रमांकाचे मानांकन मिळविले. कुरुंदवाड शहरातील बालगट, कुमार गट, विद्यालय आणि महाविद्यालय अशा विविध गटातून विविध विषयाच्या स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. त्यामध्ये कुमार विद्यामंदिर नंबर तीनच्या इयत्ता तिसरीमध्ये शिकणारी कुमारी शर्वरी राजगोंडा पाटील हिने कथाकथन स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे मानांकन मिळविले.
कुरुंदवाड येथील नगर वाचनालयाच्या वतीने प्राथमिक, माध्यमिक आणि विद्यालयीन गटातून वक्तृत्व, निबंध आणि कथाकथन अशा विषयातून स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. त्यामध्ये माध्यमिक गट इयत्ता आठवी ते दहावी मध्ये कु. ईश्वरी दत्तात्रय चौगुले न्यू इंग्लिश स्कूल फॉर गर्ल्स प्रथम क्रमांक, स्नेहल सचिन कांबळे सीताबाई पटवर्धन हायस्कूल ही द्वितीय क्रमांक, रिया खंडू कोठावळे पटवर्धन हायस्कूल तृतीय क्रमांक तर पाचवी ते सातवीच्या गटात कृतिका गौरविचंद्र पंजा कुमार विद्यामंदिर नंबर तीन प्रथम क्रमांक, वैदही प्रमोद कुंभार पटवर्धन हायस्कूल द्वितीय क्रमांक, सिद्धेश गणेश नलवडे सैनिकी पॅटर्न निवासी प्रशाला तृतीय क्रमांक, वक्तृत्व स्पर्धेत महाविद्यालयीन गटात कु. श्रावणी अनिल सुतार दत्त कनिष्ठ महाविद्यालय प्रथम क्रमांक, कुमारी संबोधि जवाहर कांबळे द्वितीय, कुमारी श्रद्धा गजानन वंटे, द्वितीय, माध्यमिक गट आठवी ते दहावी मध्ये प्रथमेश रवींद्र पाटील सैनिकी पॅटर्न निवासी शाळा प्रथम, कमलेश नामदेव जगताप निवासी शाळा द्वितीय, आयुष्य गौतम सोनताठे निवासी प्रशाला तृतीय क्रमांक, तर प्राथमिक गट पाचवी ते सातवी मध्ये कनक युवराज शिकलगार कुमार विद्यामंदिर नंबर तीन प्रथम, स्वरा हेमंत आवटी पटवर्धन हायस्कूल द्वितीय,तन्मय शितल पिंपळे निवासी प्रशाला तृतीय तर प्रतीक्षा सुनील लोहार पटवर्धन हायस्कूल तृतीय क्रमांक तर कथाकथन स्पर्धेत शर्वरी राजगोंडा पाटील कुमार विद्यामंदिर नंबर तीन प्रथम, आरुष बाहुबली पाटील कुमार विद्या मंदिर नंबर तीन द्वितीय,तर स्वस्ति सुहास बेडक्याळी तृतीय क्रमांकांचा मान मिळविला. विजेत्या विद्यार्थ्यांना कुमार विद्यामंदिर नंबर तीनचे मुख्याध्यापक रवीकुमार पाटील अध्यापक किरण माने यांचे मार्गदर्शन लाभले.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा