प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला कोल्हापूर परिक्षेत्राच्या विशेष पोलीस महानिरीक्षकांना राष्ट्रपती पदक
कोल्हापूर / शिवार न्यूज नेटवर्क :
प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला (शनिवार) विशिष्ट सेवेसाठी पोलीस अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पदक जाहीर करण्यात आले. कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांच्यासह महाराष्ट्रातील चार वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना हा सन्मान मिळाला आहे.
विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांची प्रदीर्घ सेवा, उत्कृष्ट कामगिरी आणि लोकहितासाठी केलेले कार्य यांची दखल घेऊन त्यांना हा सन्मान देण्यात आला आहे. त्यांच्यासोबत महाराष्ट्रातील आणखी तीन वरिष्ठ पोलीस अधिकारी या यादीत समाविष्ट आहेत.
हा पुरस्कार पोलीस दलातील अधिकारी व कर्मचारी यांच्या उत्कृष्ठ कामगिरीचा सन्मान करत राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान केला जातो. समाजासाठी विशेष योगदान देणाऱ्या आणि कर्तव्याप्रती असलेल्या निष्ठेमुळे या अधिकाऱ्यांची निवड करण्यात आली आहे.
सुनील फुलारी यांना मिळालेल्या या पदकामुळे कोल्हापूर परिक्षेत्रातील पोलीस दलात आनंदाचे वातावरण असून, त्यांच्या कामगिरीचे कौतुक होत आहे. स्थानिक नागरिक, सहकारी अधिकारी आणि पोलीस दलातील कर्मचाऱ्यांनी याबद्दल अभिमान व्यक्त केला आहे.
पोलीस दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रेरणा देणारा हा सन्मान त्यांच्या समर्पणाची पावती आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त हा सन्मान घोषित होणे ही त्यांच्या कार्यक्षमतेची पोचपावती ठरली आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा