सीमाभागातील विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती प्रश्नासाठी पुढाकार



 साताप्पा कांबळे / शिवार न्यूज नेटवर्क :

 सीमाभागातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचा रखडलेला प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रा. डॉ. दिवाकर सर आणि प्रा. नामदेव मधाळे सर यांनी हुक्केरी येथे जाऊन विविध मान्यवरांची भेट घेतली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमानिमित्त हुक्केरी येथे भारतीय बौद्ध महासभेचे प्रमुख राजरत्न आंबेडकर, पालकमंत्री सतीश जारकीहोळी आणि समाजकल्याण मंत्री एच. सी. महादेवप्पा उपस्थित होते. या संधीचा फायदा घेत दिवाकर सर आणि मधाळे सर यांनी लाईटहाऊस फाउंडेशनचे प्रमुख पुंडलिक कांबळे आणि विकी कांबळे यांच्या सोबत मंत्र्यांची भेट घेतली.

विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी अवघड प्रक्रिया पार करावी लागते, परिणामी अनेक विद्यार्थी या सुविधेपासून वंचित राहतात. हा प्रश्न मार्गी लागावा यासाठी मंत्र्यांना निवेदन सादर करून तत्काळ उपाययोजना करण्याची विनंती करण्यात आली. गेल्या अनेक वर्षांपासून हा प्रश्न प्रलंबित असल्याने त्यावर ठोस निर्णय घेण्याची मागणी यावेळी करण्यात आली.



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष