गुरुदत्त शुगर्स शेतकऱ्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभा- चेअरमन माधवराव घाटगे
कारखान्यातर्फे वैद्यकिय कामी शेतकऱ्यांना धनादेश प्रदान
जयसिंगपूर / शिवार न्यूज नेटवर्क :
श्री गुरुदत्त शुगर्स लि; टाकळीवाडी ने नेहमीच शेतकरी हिताचा कारभार केला आहे. त्यांच्या प्रत्येक सुख - दुःखात कारखाना त्यांच्या पाठिमागे खंबीरपणे उभा राहिला आहे. त्यामुळे कारखाना व शेतकरी यांच्यातील ऋणानुबंध आणखीन घट्ट झाले असून त्यांच्या पाठबळावर गुरूदत्त शुगर्स ने साखर उद्योगात गरुडभरारी घेतली असल्याचे मत श्री गुरुदत्त शुगर्स चे चेअरमन माधवराव घाटगे यांनी व्यक्त केले. २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त कारखाने कार्यस्थळावरती कारखान्याच्या 'गुरुदत्त किसान कार्ड ' योजने अंतर्गत विविध शेतकऱ्यांना वैदयकिय कामी २ लाख रुपयांचे धनादेश वाटप कार्यक्रम प्रंसगी ते बोलत होते .
पुढे बोलताना श्री घाटगे म्हणाले, कारखान्याने ' किसान कार्ड 'योजनेतून शेतकरी व त्यांच्या कुटुंबियांना विविध आजारपण व शस्त्रक्रियेसाठी ३० हजार रुपयांची वैद्यकीय विमा तसेच अपघाती मृत्यू झाल्यास १ लाख रुपयांचे विमा कवच उपलब्ध करून दिले आहे. तसेच एफ.आर.पी.पेक्षा अतिरिक्त २०० रुपये प्रतिटन ऊसदर तसेच १ रुपये नाममात्र दराने १ किलो साखर शेतकऱ्यांना दिली जात आहे .
श्री. घाटगे म्हणाले, गुरुदत्त किसान कार्ड योजने अंतर्गत आतापर्यंत १० हजार शेतकर्यांनी लाभ घेतला असून २३४ शेतकऱ्यांना विविध प्रकारच्या शस्त्रक्रिया व उपचारांसाठी प्रत्यक्ष मदत झाली आहे. गळीत हंगाम २०२३ -२४ मध्ये या योजनेतून ९४ शेतकर्यांना वैद्यकिय कामी १६ लाख २५ हजार रुपयांची मदत झाली आहे. हंगाम २०२४ -२५ मध्ये किसान कार्ड योजनेत शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून सर्व शेतकऱ्यांनी आपला जास्तीत जास्त ऊस या योजनेत नोंद करून गळीतास कारखान्यास पाठवावे असे आवाहन श्री घाटगे यांनी यावेळी केले.
यावेळी कार्यक्रमाला एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर राहुल घाटगे ,संचालक शिवाजीराव माने-देशमुख, शिवाजी सांगले, बबन चौगुले, धोंडिराम नागणे,अण्णासाहेब पवार, शेतकरी, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते .
.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा