थोर स्वातंत्र्यसेनानी धोंडिबा बरगाले यांच्या निवासस्थानी ७६ वा प्रजासत्ताक दिन साजरा
हेरवाड / शिवार न्यूज नेटवर्क :
थोर स्वातंत्र्यसेनानी धोंडिबा बरगाले यांच्या निवासस्थानी ७६व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाचे ध्वजारोहण बी.एम. देशमुख यांच्या हस्ते संपन्न झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्ते बंडू बरगाले होते.
यावेळी प्रमुख उपस्थितीत माजी ग्रामपंचायत सदस्य सीमा बरगाले, सदानंद आलासे, जमीर मुल्ला, युनुस जमादार, सदाशिव झुणके, कऱ्याप्पा बरगाले, स्वप्निल अपराज, अतवीर पाटील, विशाल बुडकर, सागर उगारे, राजू गोंधळी, अमोल कुंभार, महेश अकिवाटे, दत्ता अकिवाटे, मयूर कुंभार, मोहन बरगाले, श्रीवर्धन बरगाले, तुळशीदास माने आणि विठ्ठल पुजारी उपस्थित होते.
कार्यक्रमाला अंगणवाडीच्या सेविका, लहान बालके, आणि गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहून प्रजासत्ताक दिनानिमित्त राष्ट्रीय भावना आणि देशभक्तीचे दर्शन घडवले. या प्रसंगी विविध सामाजिक आणि देशहित विषयांवर विचारमंथन करण्यात आले. कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करताना उपस्थितांनी एकतेचा संदेश देत राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा