इंद्रायणी यादव यांना ‘सामाजिक महाराष्ट्र भूषण पुरस्कार २०२५’ जाहीर
जांभळी / शिवार न्यूज नेटवर्क :
सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेत पैलवान सुभाषदादा पाटील युथ फौंडेशन, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने इंद्रायणी नेताजी यादव यांना ‘सामाजिक महाराष्ट्र भूषण पुरस्कार २०२५’ जाहीर करण्यात आला आहे.
या पुरस्काराच्या माध्यमातून सामाजिक कार्य, उद्योजकता, कृषी, कला आणि पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव केला जातो. यंदा महाराष्ट्रभरातून अर्ज मागविण्यात आले होते, त्यामध्ये यादव यांच्या उल्लेखनीय कार्याची विशेष नोंद घेण्यात आली.
लवकरच एका भव्य समारंभात हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार असून, संस्थापक अध्यक्ष पैलवान सुभाषदादा पाटील यांनी त्यांच्या कार्यास पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा