गुरुदत्त शुगर्स चे चेअरमन माधवराव घाटगे यांना आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित
दिल्ली येथे सिया या संस्थेकडून सामाजिक कार्याबदल गौरव
जपसिंगपूर / शिवार न्यूज नेटवर्क :
श्री गुरुदत्त शुगर्स लि; टाकळीवाडी चे चेअरमन माधवराव घाटगे यांनी कारखान्याच्या माध्यमातून केलेल्या विविध प्रकारच्या सामाजिक कार्याबदल दिल्ली येथील सिया या संस्थेकडून श्री. घाटगे यांना शुगर- इथेनॉल - बायोएनर्जी या आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. बॉलिवुड अभिनेत्री हिना खान यांच्या हस्ते चेअरमन माधवराव घाटगे यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमात सकाळच्या सत्रामध्ये केद्रीय रस्ते वहातुक व महामार्ग मंत्री नितिन गडकरी यांनी यावेळी साखर उद्योग संदर्भात मार्गदर्शन केले.
श्री. घाटगे यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याने तांत्रिक कार्यक्षमते सोबतच सामाजिक कार्यातून परिसराचा कायापालट केला आहे. कारखान्या माध्यमातून प्रत्यक्ष - अप्रत्यक्षरित्या दहा हजार कुटुंबियांना रोजगार मिळाला आहे. शिरोळ तालुक्यात २००५, २०१९, २०२१ व २०२४ च्या महापूरात कारखान्याने १० हजार पूरग्रस्त व ५ हजार जनावरांना स्व: खर्चाने छावणी उभा करून मानवतेचे महान कार्य करून हजारो पूरग्रस्तांना आधार देण्याचे काम केले . कोरोना महामारीच्या काळात पाच हजार ऊसतोडणी मजूर, शिरोळ तालुक्यातील एक हजार रिक्षाचालक व जोतिबा डोंगरावरील एक हजार पुजारी यांना महिनाभर पुरेल इतके जीवनाश्यक साहित्याचे वाटप केले. सैनिक टाकळी येथिल प्राथमिक आरोग्य केंद्रात नागरिकांना कोरोना लस देणेसाठी सिरिंजची कमतरता होती. त्याची दखल श्री. घाटगे यांनी घेत तात्काळ पन्नास हजार सिरिंज उपलब्य केली त्यामुळे अनेक नागरिकांना कोरोना लसीकरण होण्यास मदत झाली. तसेच नागरिकांना तीस हजार अर्सेनिक अल्बम या रोगप्रतिकार गोळ्याचे वाटप केले.
सामाजिक कार्यासोबतच श्री. घाटगे यांनी अपंग बांधवाना स्वःताच्या पायावर उभे राहण्यासाठी कारखाना कार्यस्थळावर शिबिर आयोजित केले. या शिबिरातून ३५० अपंग बांधवाना एक लाख रुपये किंमतीचे जयपूर फूट वाटप केले. २०१८ मध्ये शिरोळ तालुक्यात जनावरांमध्ये लाळ-खुरकत रोगाची लागण होऊन अनेक जनावरे दगावली. मुक्या जनावरांची ही अवस्था पाहून श्री. घाटगे यांनी श्री गुरुदत्त चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून संपूर्ण तालुक्यातील प्रत्येक गावात पशु वैद्यकिय शिबिर आयोजित करून २०,००० हजार जनावरांची मोफत तपासणी करून सर्व औषधोपचार केला. तसेच सामाजिक बांधिलकेच्या भावनेतून श्री. घाटगे यांनी कारखान्याच्या किसान कार्ड योजनेत ऊस पुरवठा करणाऱ्या १० हजार शेतकरी बांधवांचा वैद्यकिय विमा व अपघात विमा यांचे कवच दिले. या योजनेतून अनेक शेतकऱ्यांना विविध प्रकारच्या शस्त्रक्रिया व उपचारासाठी ५० लाख रुपयांची मदत मिळाली आहे.
महाराष्ट्राच्या साखर उद्योगाच्या पटलावर गुरुदत्त शुगर्स व सामाजिक कार्य हे एक समीकरण तयार झाले आहे. संकट काळामध्ये मानवतेच्या भावनेतून नागरिकांच्या मदतीला धावून गेले पाहिजे. कारखान्याच्या माध्यमातून नैसर्गिक आपत्ती, वैद्यकिय कामी या संकटाच्या काळात व इतर सामाजिक कार्यात आम्ही फळाची अपेक्षा न ठेवता निरपेक्ष भावनेने मदत केली. पुढील काळातदेखील नैसार्गिक आपत्तीच्या व इतर सामाजिक कार्यात ' गुरुदत्त शुगर्स ' परिवार नागरिकांच्या पाठिशी उभा राहिल .
- माधवराव घाटगे (चेअरमन - श्री गुरुदत्त शुगर्स)

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा