टाकवडे येथील कै. स्वातंत्र्यसैनिक बळवंतराव कुलकर्णी सार्वजनिक ग्रंथालयाचा वतीने वाचन संकल्प अभियान संपन्न
हैदरअली मुजावर / शिवार न्यूज नेटवर्क :
टाकवडे येथील कै. स्वातंत्र्यसैनिक बळवंतराव कुलकर्णी सार्वजनिक ग्रंथालय मध्ये ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ.शि. रा. रंगनाथन व स्वातंत्र्य सैनिक बळवंतराव कुलकर्णी यांच्या प्रतिमेचे पुजन सरपंच सौ. सविता चौगुले यांचा हस्ते करण्यात आले. यावेळी स्वागत व प्रास्ताविक ग्रंथपाल सौ .दिपा कुलकर्णी यांनी केले. मनोगता मध्ये संस्थेच्या अध्यक्ष दत्तात्रय कुलकर्णी यानी शासना मार्फत राबविण्यात येणाऱ्या वाचन संकल्प अभियान चे महत्व विसर करून सततच्या पुस्तक वाचनाने मणूसाचा सर्वागींण विकास घडतो असे उदगार काढले. व्यंकटेश महाविद्यालय इचलकरंजी येथील महाविद्यालयीन विद्यार्थी व विद्यार्थीनी शाळेय मुलानीं अभ्यास कसा करावा .व दाहावी नंतर पुढे काय यांचे अनमोल असे मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमास सौ.सरिता स्वामी. सौ.सुजता पाटील. कृष्णात वडर. देवगोंडा चौगुले. संजय लोहार. अनिल हुपरीकर .शिवाजी कदम. आण्णासो वडर .संजय कागवाडे .अनिल पाटील . राजेंद्र दिंडे निळकंठ पाटील . जमाल फकीर. यांचा सह वाचक, विद्यार्थी, विद्यार्थीनी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा