सहकारभूषण एस.के. पाटील कॉलेज, कुरुंदवाड येथे इयत्ता बारावीचा शुभेच्छा समारंभ उत्साहात संपन्न

 


कुरुंदवाड / शिवार न्यूज नेटवर्क : 

सहकारभूषण एस.के. पाटील महाविद्यालय, कुरुंदवाड येथे इयत्ता बारावीचा शुभेच्छा समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी प्रमुख पाहुणे दानवाड हायस्कूलचे मुख्याध्यापक महेश पोळ यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले, "यशस्वी होण्यासाठी कठोर परिश्रमाशिवाय पर्याय नाही. गुणात्मकतेसोबतच संस्कार व बौद्धिक ज्ञानालाही महत्त्व दिले पाहिजे. महाविद्यालयाने दिलेली ज्ञानशिदोरी जीवनात यश प्राप्त करण्यासाठी उपयोगात आणा."

कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक पाटील ए.के. यांनी केले. यावेळी बारावीच्या विद्यार्थ्यांना कॉफी मुक्ततेची शपथ देण्यात आली, ज्याचे वाचन शेख एस.आय. यांनी केले. कार्यक्रमात माजी विद्यार्थिनी तातियाना माने यांनी आपल्या शैक्षणिक अनुभवांचे मार्गदर्शन केले.

प्रथम वृक्षाला जलअर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. भूगोल प्रज्ञाशोध परीक्षा आणि मराठी भाषा संवर्धन परीक्षेत यशस्वी झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

कार्यक्रमासाठी प्रभारी प्राचार्य डॉ. आर.एस. कदम, प्रा. साठे आर.ए., ज्युनिअर पर्यवेक्षक संदीप सावगावे, अधीक्षक भरत बिडकर यांच्यासह संस्थेचे अध्यक्ष जयराम बापू पाटील व संचालक मंडळ उपस्थित होते. पालक प्रतिनिधी म्हणून बाबर मॅडम यांनी मनोगत व्यक्त केले.

सूत्रसंचालन योगिनी भोसले व अमृता कागले यांनी केले, तर आभार प्रदर्शन महेश गायकवाड यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष