श्री गुरुदत्त शुगर्स ला तांत्रिक कार्यक्षमता पुरस्कार प्रदान
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट तर्फे कारखान्याचा सन्मान
जयसिंगपूर / शिवार न्यूज नेटवर्क :
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पुणे यांच्या वतिने गळीत हंगाम सन २०२३ - २४ मध्ये दक्षिण विभागामध्ये श्री गुरुदत्त शुगर्स लि; टाकळीवाडी ने तांत्रिक विभागामध्ये राबवलेल्या नाविन्यपूर्ण कार्याबदल द्वितीय पारितोषक पटकावत तांत्रिक कार्यक्षमता पुरस्कार प्रदान करण्यात आला. व्हीएसआय च्या वार्षिक सर्वसाधारण सभेत देशाचे माजी केंद्रिय कृषीमंत्री शरद पवार , राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व व्हीएसआय चे उपअध्यक्ष आमदार दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते कारखान्याचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर राहूल घाटगे व त्यांच्या टीमने हा पुरस्कार स्वीकारला.
कारखान्याचे चेअरमन माधवराव घाटगे यांनी साखर कारखान्यामध्ये नव - नवीन तंत्रज्ञानाचा अभ्यास करीत तांत्रिक कार्यक्षमेवर भर देत साखर उद्योगात 'गुरुदत्त शुगर्स' ला रोल मॉडेल बनवले आहे . श्री. घाटगे यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याने गळीत हंगामामध्ये ऊसामधील एकूण साखरेपैकी ९६.२४ % साखरेचे उत्पादन घेतले आहे. तसेच साखर तयार करण्यासाठी कमीत -कमी वाफेचा उपयोग करून साखरेची निर्मिती केली आहे. कारखान्यातील बाहेर पडणारा धुर हवेत न सोडता बगॅस ड्रायर सिस्टिम बसवुन तो बगॅस मध्ये वळवला. त्यामुळे बगॅसची ज्वलनक्षमता वाढली गेली व आर्द्रतेचे प्रमाण ४८.९४% वरून ३८% पर्यंत कमी होऊन हवेचे प्रदुषण कमी होऊन कारखान्याची तांत्रिक कार्यक्षमता वाढली गेली. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्याने हंगामात मिल बंद काळाचे प्रमाणे अर्धा (०.५३% ) टक्क्यावर येऊन मिल विभागात कोणत्याही प्रकारचे नविन उपकरण न बदलता गाळप क्षमता ४% ने वाढली . श्री गुरुदत्त शुगर्स लि; टाकळीवाडी च्या या सर्व तांत्रिक कार्याबदल व्ही.एस.आय. ने हा पुरस्कार देऊन कारखान्याला गौरवण्यात आले.
कारखान्याने ऊस उत्पादक शेतकरी ,ऊसतोडणी कामगार, तोडणी -ओढणी कंत्राटदार, संचालक मंडळ कारखान्याचे अधिकारी व कर्मचारी यांच्या सहकार्याने व त्यांच्या पाठबळावर आतापर्यंत २० गळीत हंगाम यशस्वीपणे पूर्ण केले असून ह्या पुरस्काराची सर्व श्रेय त्यांना जात असल्याचे मत चेअरमन माधवराव घाटगे यांनी व्यक्त केले.

मला आवड आहे
उत्तर द्याहटवा