हेरवाडमध्ये वाढत्या अपघातांना आळा घालण्यासाठी बॅरिकेड्स बसवा : शिवसेनेची मागणी
हेरवाड / शिवार न्यूज नेटवर्क :
गावातील महामार्गावर सतत वाढत असलेल्या अपघातांना आळा घालण्यासाठी शिवसेना शाखा हेरवाडच्या वतीने ग्रामपंचायतीकडे बॅरिकेड्स बसवण्याची मागणी करण्यात आली आहे. यासंदर्भात शाखाप्रमुख विशाल जाधव यांनी सरपंच रेखा जाधव व ग्रामसेवक यांना लेखी निवेदन दिले आहे.
गेल्या काही महिन्यांपासून पाचवा मैल ते सलगरे हा राज्य महामार्ग मोठा करण्यात आला आहे. यामुळे वाहतुकीचा वेग मोठ्या प्रमाणात वाढला असून, वाहनचालक बेफाम गतीने वाहने चालवत आहेत. परिणामी, गावात अपघातांचे प्रमाण वाढले असून, अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
विशेषतः या महामार्गालगत जिल्हा परिषदेचे कन्या विद्या मंदिर असल्याने विद्यार्थिनींना मोठ्या धोक्याचा सामना करावा लागत आहे. रस्ता ओलांडताना त्यांना भीती वाटते, तसेच शाळेच्या परिसरात वाहनांची प्रचंड गर्दी होते.
या परिस्थितीवर तोडगा काढण्यासाठी शिवसेनेच्या वतीने गावातील तीन ठिकाणी बॅरिकेड्स बसवण्याची मागणी करण्यात आली आहे. यापूर्वीही शिवसेनेने याबाबत ग्रामपंचायतीकडे सूचना दिल्या होत्या.
गावाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने लवकरात लवकर उपाययोजना कराव्यात, अशी मागणी शिवसेना शाखाप्रमुख विशाल जाधव यांनी केली आहे. यावेळी युवा सेना उपतालुकाप्रमुख आसिफ विजापूरे, राजू ढोणे, कामगार सेना तालुकाप्रमुख बाबासाहेब देबाजे, अदनान जमादार, सोहेल विजापुरे, सद्दाम विजापूरे, राहुल ईटाज, दिलावर नदाफ, सुरज कुन्नुरे, उत्तम कोरवी, बंडू कुन्नुरे, संतोष शिरोळे, अनिल कोरवी, साहिल नदाफ, सतिश कुन्नुरे आदी उपस्थित होते.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा