श्री मंगराया सेवा सोसायटी तेरवाडमध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
तेरवाड / शिवार न्यूज नेटवर्क :
श्री मंगराया सेवा सोसायटी तेरवाड येथे प्रजासत्ताक दिन मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला. ध्वजवंदनाचा मान यंदा 10वी बोर्ड परीक्षेत तेरवाडमध्ये सर्वाधिक गुण मिळवलेल्या कु. अमृता प्रशांत अंदरघिसके हिला देण्यात आला. तिच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले.
कार्यक्रमाला पार्वती सुत गिरणीचे व्हा. चेअरमन शाबगोंडा पाटील, संस्थेचे चेअरमन दत्तगोंडा पाटील, व्हा. चेअरमन रमजान जमादार, संचालक अरुण गायकवाड, सिद्धराम मठपती, माजी ग्रामपंचायत सदस्य राजू मगदूम, सचिन गायकवाड तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुरज कांबळे व सदस्य प्रशांत गायकवाड, प्रदीप कांबळे यांसह विविध मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक युवराज पाटील यांनी केले तर स्वागत अमोल खोत सर यांनी केले. संस्थेचे सचिव श्रीशैल्य मठपती यांनी उपस्थितांचे आभार मानले. या वेळी विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले, ज्याला उपस्थितांनी भरभरून दाद दिली. हा कार्यक्रम गावकऱ्यांच्या मोठ्या सहभागाने आणि उत्साहाने पार पडला.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा