जयसिंगपूर येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त पूज्य आचार्यश्री विशुध्दसागरजी महाराज यांचे सर्वधर्मिय देशभक्तिपर मंगल प्रवचन

 आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांची माहिती


जयसिंगपूर / शिवार न्यूज नेटवर्क :

प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून दि. 26 जानेवारी रोजी सकाळी 8.35 वाजता विक्रमसिंह क्रीडांगण, जयसिंगपूर येथे अध्यात्मयोगी पूज्य आचार्यश्री विशुध्दसागरजी महाराज यांचे सर्वधर्मीय देशभक्तिपर मंगल प्रवचन आयोजित करण्यात आले आहे. या मंगल प्रसंगी पूज्य आचार्यश्रींच्या प्रेरणादायी विचारांचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री. 1008 पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष व आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी केले आहे. या सर्वधर्मीय देशभक्ती प्रवचनाला प.पू. 108 आचार्य श्री चंद्रप्रभसागरजी महाराज, प.पू. स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी यांचे मंगल सानिध्य लाभणार आहे.

नुकत्याच नांदणी येथे पार पडलेल्या भव्य पंचकल्याण पूजामहोत्सव व महामस्तकाभिषेक सोहळ्यास आपल्या मंगल सान्निध्याने आणि मार्गदर्शनाने गौरव प्राप्त करून देणारे पूज्य आचार्यश्री भारतातील श्रेष्ठ दिगंबर जैन मुनि आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली 550 हून अधिक मुनी अध्यात्माच्या वाटेवर अग्रणी आहेत.

आचार्यश्रींचे साहित्यिक योगदानही उल्लेखनीय असून, त्यांनी हिंदी भाषेत 250 हून अधिक ग्रंथांची रचना केली आहे. त्यांच्या महाकाव्य "वस्तुत्व महाकाव्य"ला गोल्डन वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये स्थान मिळाले आहे. याशिवाय "सत्यार्थ बोध" आणि "कर्म विपाक" या ग्रंथांचीही जागतिक स्तरावर नोंद झालेली आहे.

प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून आयोजित या मंगल प्रवचनामध्ये जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी केले आहे. पूज्य आचार्यश्रींच्या मार्गदर्शनाने धर्म, राष्ट्रभक्ती आणि आदर्श जीवनाच्या तत्वांची शिकवण मिळेल, असा विश्वासही त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष