हासिद्धनाथ यात्रेनिमित्त महाप्रसादाचा भाविकांनी घेतला लाभ



हेरवाड / शिवार न्यूज नेटवर्क :

येथील श्री हासिद्धनाथ यात्रेनिमित्त महाप्रसाद वितरणाचा कार्यक्रम मोठ्या भक्तिमय वातावरणात पार पडला. आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या हस्ते महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. यावेळी त्यांनी श्री हासिद्धनाथाचे दर्शन घेतले आणि भाविकांना शुभेच्छा दिल्या.

या सोहळ्याच्या निमित्ताने मोठ्या संख्येने भाविकांनी उपस्थित राहून महाप्रसादाचा लाभ घेतला. यात्रेच्या निमित्ताने गावात भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते. भाविकांनी श्री हासिद्धनाथाच्या चरणी नतमस्तक होत आपल्या मनोकामना व्यक्त केल्या.

महाप्रसाद कार्यक्रमानंतर आमदार यड्रावकर यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. गावाच्या विकासासाठी त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण असल्याचे यावेळी उपस्थित मान्यवरांनी सांगितले.

या कार्यक्रमाला दिलीप पाटील, सामाजिक कार्यकर्ते बंडू बरगाले, ग्रामपंचायत सदस्य सचिन पाटील, दीपक बंडगर, रावसाहेब पाटील यांच्यासह अनेक मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष