माजी विध्यार्थी रोहिणी व राणी यांनी केले शाळेत वह्या वाटप

 


अजित कांबळे / शिवार न्यूज नेटवर्क :

बोरगाव येथे 76 व्या प्रजासत्ताक कार्यक्रमाचे औचित्य साधून स्वतंत्र सैनिक कै गुंडू सातपुते यांच्या नाती व प्रतिष्ठित नागरिक बाळासाहेब सातपुते यांच्या मुली, मराठी शाळेच्या माजी विद्यार्थिनी रोहिणी सातपुते ( लायकर) व राणी सातपुते (खोत ) यांनी शाळा विषयी असलेले प्रेम व कृतज्ञता म्हणून तीनशेहून आधिक शालेय विद्यार्थ्यांना वह्या व पेन वाटून बोरगाव पी एम श्री सरकारी मराठी शाळेवर असलेले प्रेम त्यांनी दिलेल्या देणगीतून व्यक्त केले.

     बोरगांव येथे पी एम श्री सरकारी प्राथमिक मराठी शाळेत सालाबाद प्रमाणे प्रजासत्ताक दिन मोठ्या उस्थाहात साजरा करण्यात आला. यावर्षी माजी विद्यार्थ्यांनी केलेल्या या उपक्रमातून एक वेगळा संदेश समांजा समोर आला आहे .

   कार्यक्रमाची सुरवात डॉ बाबासाहेब आंबेडकर व महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून पूजन करण्यात आले. वही व पेन रोहिणी व राणी याच्या हस्ते विध्यर्त्याना यावेळी वितरण कऱण्यात आले.

      रोहिणी व राणी यांचे याच प्राथमिक शाळेत शिक्षण झाले आहे. ,शाळेतील आठवणी ,शिक्षकांवरील असलेली प्रेम ,या दोघींनी न विसरता परत शाळेत जाऊन आज एक विधायक सामाजिक उपक्रम राबवून समाजासमोर एक आदर्श ठेवला आहे .

  या उपक्रमामुळे गरजू ,गरीब विद्यार्थी यांना लाभ मिळणार आहे. 

   यावेळी माजी मुख्याध्यापक एस बी पाटील म्हणाले,रोहिणी आणि राणी यांनी सामाजिक उपक्रम राबवून समाजातील गरजू आणि वंचित घटकांसाठी केलेले कार्य खरोखरच कौतुकास्पद आहे. अशा उपक्रमांमुळे समाजात सकारात्मक बदल घडतो आणि एकता व सहकार्याची भावना वाढीस लागते. रोहिणी आणि राणी यांचे कार्य समाजासाठी प्रेरणादायी आहे. असेच कार्य सातत्याने सुरू ठेवून, अनेकांना त्या मदतीचा हात दोघी देत असल्याचे सांगितले.

  यावेळी मुख्याधपक आर .एम. पकाले म्हणाले,राबवलेला सामाजिक उपक्रम समाजासाठी खूप प्रेरणादायी ठरला आहे. अशा कार्यांमुळे अनेकांच्या जीवनात आनंद आणि आशेचा किरण निर्माण होत असल्याचे शेवटी पकाले यांनी सांगितले.

  याप्रसंगी शाळा सुधारणा समिती अध्यक्ष शिवाजी भोरे,माजी मुख्याध्यापक एस .बी .पाटील, विजय वास्कर,बाबासाहेब चौगुले,अशोक नेजे,अमित माळी,यांच्यासह गावातील विविध मान्यवर , शिक्षण प्रेमी, समाजसेवक, पालक, एसडीएमसी चे सर्व सदस्य विद्यार्थी, शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष