लाटवाडी येथील श्री महालक्ष्मी विशाळी यात्रा उत्साहात संपन्न
अजित कांबळे / शिवार न्यूज नेटवर्क :
कर्नाटक व महाराष्ट्र सीमेवर वसलेल्या लाटवाडी ची ग्रामदेवता श्री महालक्ष्मीची यात्रा सालाबाद प्रमाणे उत्साहात संपन्न झाली. शिरोळ तालुक्यातील लाटवाडी येथील ग्रामदैवत श्री महालक्ष्मी विशाळी यात्रेला बुधवार दिनांक 29 जानेवारी पासून सुरुवात करण्यात आली, सकाळी ठीक सात वाजता श्री महालक्ष्मी देवीची पालखी मिरवणूक व लक्ष्मी देवीची ओटी भरण्याचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी सौ सुनीता सदाशिव खोत उपसरपंच व सौ भाग्यश्री मल्लू खोत व मान्यवरांचे हस्ते या देवीच्या ओटी भरणे कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. सकाळी दहा नंतर संजय कोळी व सर्व पंचगंगा फडकरी मंडळ लाटवाडी यांच्या वतीने महाप्रसाद गावकऱ्यांच्यासाठी आयोजन करण्यात आले होते. तर लाटवाडी व परिसरातील शेतकरी व शर्यतीसौकीन यांच्यासाठी भव्य आणि दिव्य जनरल बैलगाडी शर्यती, जनरल ब गट, आदत दुस्सा , चौसा जनरल अशा विविध प्रकारच्या शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते
संध्याकाळी दुपारी चार वाजता भव्य निकाली जंगी कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमासाठी विविध मान्यवरांचा उपस्थितीत जंगी कुस्तीचा बहारदार कार्यक्रम करण्यात आला .
गुरुवार दिनांक 30 जानेवारी रोजी रात्र ठीक आठ वाजता गावकऱ्यांच्या मनोरंजनासाठी आर्केस्ट्रा धमाका यांचा बहारदार कार्यक्रम श्री महालक्ष्मी मंदिर स्टेज च्या आवारात करण्यात आला होता. या मनोरंजन कार्यक्रमचे उद्घाटन हालसिद्धनाथ सहकारी साखर कारखान्याचे संचालक व बोरगाव टेक्सटाईल पार्कचे अध्यक्ष नगरसेवक, शरद जंगठे, शिरोळ चे युवा नेते पृथ्वीराज यादव ,माजी नगरसेविका एडवोकेट सोनाली मगदूम, ग्रामपंचायत सदस्य आनंदा खोत, निलेश खोत, अण्णाप्पा खोत, शितल अवघडी सह विविध मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत आर्केस्ट्रा मनोरंजन कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.यावेळी गावातील सरकारी शाळेच्या मुलांच्या वतीने मैदानी खेळाचे आयोजन करण्यात आले होते .
लाटवाडी गावची ग्रामदैवता श्री महालक्ष्मी विषाळी यात्रा संपन्न होण्यासाठी यात्रा कमिटीचे कार्याध्यक्ष आनंद खोत, संदीप खोत, मल्लू अंबले, महावीर खोत, सुरेश घुबडे सह गावातील जय जवान तरुण मंडळ, ओमकार तरुण मंडळ, धनगर वाड्यातील राजा तरुण मंडळ, तिरंगा तरुण मंडळ खोत ग्रुप खोत वसाहत, आदर्श तरुण मंडळ व जिरगे वसाहत तरुण मंडळ च्या सर्व कार्यकते,गावकरी यांचा यात्रा संपन्न होण्यात मोलाचे सहकार्य लाभले

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा