नवे दानवाड येथील प्रगतशील शेतकरी व माजी सरपंच चिदानंद कांबळे यांचे निधन
दानवाड :
नवे दानवाड गावचे प्रगतशील शेतकरी, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष आणि माजी सरपंच चिदानंद बळवंत कांबळे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने 29 जानेवारी रोजी रात्री 9 वाजता निधन झाले. ते 75 वर्षांचे होते.
त्यांनी गावाच्या विकासासाठी मोठे योगदान दिले होते. सामाजिक क्षेत्रातही त्यांचा सक्रिय सहभाग होता. त्यांच्या पश्चात मुलगा, भाऊ, मुली, जावई, सून, नातवंडे, पुतणे आणि पुतन्या असा मोठा परिवार आहे. ते माजी सरपंच दिपक कांबळे यांचे वडील आणि सामाजिक कार्यकर्ते उत्तम कांबळे यांचे भाऊ होते. रक्षाविसर्जन दिनांक 31 जानेवारी रोजी सकाळी 8 वाजता दानवाड येथे होणार आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा