जयसिंगपूरात राज्यस्तरीय शरद कृषी प्रदर्शनाची तयारी अंतीम टप्यात

 


जयसिंगपूर / शिवार न्यूज नेटवर्क : 

जयसिंगपूर येथे ३१ जानेवारी पासून सहकाररत्न स्व. शामरावआण्णा पाटील (यड्रावकर) यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आमदार मा. राजेंद्र पाटील (यड्रावकर) यांच्या मार्गदर्शनाखाली शरद सहकारी साखर कारखाना नरंदे, शरद कृषी महाविद्यालय, जैनापूर, महाराष्ट्र शासन कृषी विभाग व स्कायस्टार इव्हेंट कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय भव्य ८ वे शरद राज्यस्त कृषी व पशु पक्षी प्रदर्शन होत आहे. या कृषी प्रदर्शनाची जोरदार तयारी सुरू असून प्रदर्शनाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे.

शहरातील सिध्देश्वर मंदिरा नजीकच्या गल्ली नं.४, येथील भव्य अशा खुल्या जागेत ८ व्या शरद कृषी प्रदर्शनाचे आयोजन दि.३१ जानेवारी ते ०३ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत करणेत आले आहे. प्रदर्शन सकाळी १०.०० वाजले पासून रात्री ९.०० वाजेपर्यत खुले राहणार आहे. दि.३१ जानेवारी रोजी प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे. प्रदर्शनासाठी सर्वाना विनामुल्य प्रवेश राहील.

या प्रदर्शनात शेतीसाठी लागणारी औजारे, बि-बियाणे, खते व जंतूनाशके, जलसिंचनाच्या पध्दती, ठिबकसिंचन, टिश्युकल्चर, कृषी व्यवस्थापक, शेती अर्थपुरवठा, बँकींग इन्श्युरन्स, मार्केटींग व्यवस्थापन, रोपवाटीका (नर्सरी), पाणी व्यवस्थापन, दुग्धव्यवसाय, अपारंपारीक उर्जा, मत्स्य उत्पादन, रेशीम उद्योग, सेंद्रीय शेती याच बरोबर अन्य प्रक्रिया व साठवणूक, पॅकेजींग पध्दती या माहीती बरोबर महाराष्ट्र शासनाच्या जिल्हा व तालुका कृषी विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठाअंर्तगत येणाऱ्या महाविद्यालयाकडून विविध प्रात्यक्षिके दाखविली जाणार आहेत. शेतीत नवीन प्रयोग करणा-या शेतक-यासाठी आधुनिक कृषी माहीतीपटे दाखविली जाणार आहेत. या वर्षी प्रदर्शनामध्ये दि.३१.०१.२०२५ ते ०३.०२.२०२५ या कालावधीमध्ये ऊसपीक व इतर पिकांसाठी स्पर्धेचे आयोजन केले आहे. तसेच जातीवंत पशु-पक्षी स्पर्धात्मक प्रदर्शन दि.०१.०२.२०२५ व ०२.०२.२०२५ आयोजन केले आहे. तसेच सदर प्रदर्शनामध्ये तांदूळ महोत्सव, खिचडी महोत्सव व दि.०३.०२.२०२५ रोजी डॉग व कॅट शो स्पर्धा यांचेही आयोजन केले आहे. स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणा-या शेतक-यांनी आपली जनावरे तसेच पिकाचे नमुने यांच्या नोंदी कराव्यात. तसेच सास्कृतिक कार्यक्रम दि.०१ फेब्रुवारी २०२५ सांय. ५.०० वा खेळ पैठणीचा व रात्री ९.०० वा कव्वाली , दि.०२ फेब्रुवारी २०२५ रोजी सांय. ७.०० वा. इंडियन म्युझिकल अकॅडमी जयसिंगपूर यांचा लक्ष्मीकांत प्यारेलाल मेलडीज कार्यक्रमाचे आयोजन केले आहे त्याचा लाभ घ्यावा.

प्रदर्शनासाठी भव्य मंडप, ३०० स्टॉलच्या मांडणीची रचना अशी विविध तयारी प्रदर्शनस्थळी सुरू आहे. सोमवारी सकाळी यड्रावकर उद्योग व शिक्षण समूहाचे प्रमुख आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, जयसिंगपूरचे माजी नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर, शिरोळचे माजी नगराध्यक्ष अमरसिंह माने-पाटील, प्रकाश पाटील, आदित्य पाटील यड्रावकर, सुभाषसिंग रजपूत, अविनाश खंजिरे, पोपट भोकरे,दशरथ पिष्टे, शिवगोंडा पाटील,विद्यासागर मरजे, अभिजीत भंडारी, लक्ष्मण चौगुले, आप्पासो चौगुले, संजय बोरगांवे, रविकांत कारदगे, आण्णासो सुतार, रावसाहेब कुंभोजे, गुंडा इरकर, संगिता उपाध्ये,त्रिशला नांदणे आदींनी प्रदर्शनस्थळी भेट देऊन तयारीची पाहणी केली, शरद साखर कारखान्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी भुपाल आवटी यांच्यासह मान्यवर यावेळी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष