हेरवाड-सलगर रस्त्यावर मोठा खड्डा; अपघातांचा धोका वाढला
हेरवाड / शिवार न्यूज नेटवर्क :
हेरवाड-सलगर रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतरही किरकोळ अपूर्ण कामांमुळे वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. हेरवाड येथील गायकवाड गल्लीजवळील रस्त्यावर पडलेल्या मोठ्या खड्ड्यामुळे वारंवार अपघात होत असून, अनेक जण जखमी झाले आहेत.
हा रस्ता पूर्ण झाल्यानंतर काहीच दिवसांत येथे मोठा खड्डा पडल्यामुळे वाहनधारकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. विशेषतः दुचाकीस्वारांना येथे धोक्याची स्थिती निर्माण झाली आहे. अनेक वेळा वाहन चालक हा खड्डा चुकवताना अपघातग्रस्त झाले आहेत. स्थानिक नागरिकांनी आणि वाहनधारकांनी याबाबत वारंवार तक्रारी केल्या असल्या, तरी अद्यापही हा खड्डा बुजवण्याची कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही.
रस्त्याच्या दुरवस्थेमुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. संबंधित ठेकेदार आणि प्रशासनाने तातडीने हा खड्डा बुजवावा, अन्यथा उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा स्थानिकांनी दिला आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा