कन्या विद्या मंदिर, हेरवाडच्या विद्यार्थिनींची 'छोटे सायंटिस्ट' स्पर्धेत चमकदार कामगिरी

 


हेरवाड / शिवार न्यूज नेटवर्क :

अब्दुललाट येथे KPIT संस्था, पुणे आणि विद्योदय मुक्तांगण परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘छोटे सायंटिस्ट’ स्पर्धेत कन्या विद्या मंदिर, हेरवाडच्या विद्यार्थिनींनी उल्लेखनीय कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला.

स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी विज्ञान आणि तंत्रज्ञान यासंबंधी सृजनशील प्रकल्प सादर केले. कन्या विद्या मंदिरच्या विद्यार्थिनींनी आपल्या कल्पकतेचा आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाचा उपयोग करून प्रभावी सादरीकरण केले, ज्यामुळे त्यांना प्रथम क्रमांक मिळवता आला. या स्पर्धेत भाग घेतलेल्या सर्व विद्यार्थिनींनी उत्कृष्ट प्रयत्न करून शाळेचे नाव उज्ज्वल केले. विद्यार्थिनींच्या या यशाबद्दल शिक्षक, पालक आणि ग्रामस्थांनी त्यांचे अभिनंदन केले. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष