कठोर परिश्रम व योग्य नियोजन हा उज्वल यशाचा राजमार्ग आहे : प्रियंका मोरे
अनिल जासूद / शिवार न्यूज नेटवर्क :
विद्यार्थ्यांनी जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी ज्ञानाची साधना करावी .कठोर परिश्रम व योग्य नियोजन हा उज्वल यशाचा राजमार्ग आहे, असे प्रतिपादन येथील सामाजिक कार्यकर्त्या प्रियंका दीपक मोरे यांनी केले. बाहुबली विद्यापीठ संचलित सन्मति विद्यालय तारदाळ येथे एस. एस. सी. सदिच्छा समारंभ संपन्न झाला .यावेळी ते बोलत होते .कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक सी.जी तेरदाळे हे होते .
परमपूज्य गुरुदेव समंतभद्र महाराजांच्या प्रतिमा पूजनाने कार्यक्रमास सुरुवात झाली. त्यावेळी जिया पट्टेकरी, संजीवनी वाडीकर ,चेतन चव्हाण, समीक्षा तांबवे, नाजमीन मुजावर त्यांनी मनोगत व्यक्त केलं. त्यावेळी आदर्श विद्यार्थी म्हणून अनुक्रमे सोहम कांदळकर ,पार्श्व वसगडे,तसेच आदर्श विद्यार्थिनी म्हणून अनुष्का कारंडे,योगिता सूर्यवंशी यांना प्रमाणपत्र शिल्ड देऊन पाहुण्यांच्या हस्ते गौरविण्यात आले. यावेळी पूर्व परीक्षेतील गुणवंत विद्यार्थी श्वेता कांबळे व अनुष्का कारंडे यांचा गौरव करण्यात आला. अध्यापक आर.सी.चौगुले यांनी मनोगत व्यक्त केले.मुख्याध्यापक श्री तेरदाळे म्हणाले" आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा दहावी असून येथूनच पुढे आपल्या करिअरला खऱ्या अर्थाने सुरुवात होते .यासाठी विद्यार्थ्यांनी गांभीर्यांना घेऊन योग्य नियोजन मेहनतीच्या बळावर चांगले यश संपादन करावे." यावेळी विद्यार्थ्यांनी सदिच्छा समारंभा निमित्त शालेय भौतिक सुविधांसाठी चाळीस हजार रुपयांची देणगी दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चौगुले यांनी केले व विद्यार्थिनी श्रावणी सुळकुडे आभार मानले. दहावीचे वर्गाध्यापक आर.सी चौगुले, श्वेता चौगुले व जितेंद्र आणुजे यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा