जयसिंगपुरात गांजा विक्री करताना कारवाई, दोघांवर गुन्हा ; ६० हजार रुयांपयाचा मुद्देमाल जप्त
जयसिंगपूर / शिवार न्यूज नेटवर्क :
जयसिंगपूर येथील मनीषा ऑटो जवळ असलेल्या रिंग रोडवर विनापरवाना बेकादेशीरपणे गांजा विक्री करताना जयसिंगपूर पोलिसांनी कारवाई केली. गांजासह ६० हजार ५०० रुपयेचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. ही कारवाई गुरुवारी दुपारी दीडच्या सुमारास करण्यात आली.
याप्रकरणी महादेव विठ्ठल धोत्रे (वय ३९ रा. 52 झोपडपट्टी जयसिंगपूर) व हैदर इराणी (रा. राजीव गांधी नगर जयसिंगपूर) या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद पो.कॉ.वैभव सुर्यवंशी यांनी जयसिंगपुर पोलिसात दिली आहे.
याबाबत जयसिंगपुर पोलिसातून मिळालेली माहिती अशी, जिल्ह्यात गांजा विरोधात मोहीम सुरू आहे. या पार्श्वभूमीवर जयसिंगपूर शहरात गांजा विक्री सुरू असल्याची माहिती जयसिंगपूर पोलिसांना मिळाले होती. गुरुवारी दुपारी दीडच्या सुमारास रिंग रोडवर महादेव धोत्रे हा गांजा विक्री करत असताना जयसिंगपूर पोलिसांना आढळून आला. याच्याकडून 463 ग्रॅम असा ५ हजार ५०० रुपये किमतीचा गांजा, 45 हजार रुपये किमतीची दुचाकी, दहा हजार किमतीचा मोबाईल असा एकूण ६० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.
ही कारवाई पोलीस निरीक्षक सत्यवान हाके, पोलीस उपनिरीक्षक प्रवीण माने, पो.हे.को. निलेश मांजरे, पो.कॉ .वैभव सूर्यवंशी, बाळासो गुप्ते, मिलन शिंगाडे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी केली. यावेळी धोत्रे याला जयसिंगपूर पोलिसांनी अटक केली आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा