चाँदशिरदवाड ग्रामपंचायत अध्यक्षपदी भाजपच्या बाळाबाई पुजारी यांची बिनविरोध निवड

 


अजित कांबळे / शिवार न्यूज नेटवर्क :

 चांदशिरदवाड ता निपाणी येथील ग्रामपंचायतीच्या झालेल्या अध्यक्ष निवडीत   भाजपच्या श्रीमती बाळाबाई कऱ्याप्पा पुजारी यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणूक अधिकारी म्हणून विजयलक्ष्मी बाळेहोसुर सहा.निर्देशक निपाणी नगर पंचायत ,यांनी काम पाहिले.यावेळी  त्यांच्या समर्थकानी फटाके व गुलालाची उधळण करीत आनंदोत्सव साजरा केला.

  ग्रामपंचायत अध्यक्षा दिक्षिता कांबळे यांचा निर्धारीत कार्यकाल संपल्याने   निवडीचा कार्यक्रम लागला होता.  अध्यक्ष  पदांसाठी बाळाबाई पुजारी यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक अधिकारी यांनी जाहीर केले .यावेळी नूतन व मावळते अध्यक्ष तसेच निवडणूक अधिकारी यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

. यावेळी बोलताना नूतन अध्यक्षा बाळाबाई पुजारी म्हणाल्या,मला सर्वांच्या सहकार्याने अध्यक्षपदाचा मान मिळाला आमदार सौ शशिकला जोल्ले,माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली गावच्या विकासासाठी सर्व सदस्यांना एकत्रित घेवुन विकास कामे करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले. स्वागत करून आभार विकास अधिकारी नागराज शिंदे यांनी मानले

      यावेळी माजी अध्यक्ष सुरेश खोत, माजी अध्यक्षा जयश्री पाटील,माजी उपाध्यक्ष शितल लडगे, उपाध्यक्ष विजय रोहिदास,माजी अध्यक्षा दिक्षिता कांबळे आण्णा पाटील यास्मिन चाऊस,अशोक पाटील , संजय पाटील नारायण हिरवे ,अनिल पुजारी अमर कांबळे, ,शितल पाटील , अनिल पाटील,शांतीनाथ डुणुंग, जावेद मुजावर , बंटी पाटील अजित तोडकर,सचिन पडलिहाळे , ,किरण पडलिहाळे, विजय चिमाई, इ. मान्यवर ग्रामपंचायत कर्मचारी,व भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष