श्रीदत्त कनिष्ठ महाविद्यालयाचे बारावी बोर्ड परीक्षेसाठी केंद्र सज्ज
कुरुंदवाड / शिवार न्यूज नेटवर्क :
कुरुंदवाड ता.शिरोळ येथील श्री दत्त कनिष्ठ महाविद्यालय हे बारावी बोर्ड परीक्षेचे केंद्र असून बोर्ड परीक्षेच्या दृष्टीने सर्व तयारी करण्यात येत आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना आसन व्यवस्था ,पिण्याचे पाणी ,वैद्यकीय सुविधा ,विद्युत पुरवठा, प्रवास सुविधा या अनुषंगाने संबंधित विभागाशी संपर्क करून केंद्र नियोजनपूर्वक सज्ज होत आहे.
केंद्र संकेतांक -0513 श्री दत्त कनिष्ठ महाविद्यालय बैठक व्यवस्था शाखेनुसार विज्ञान (परिक्षा क्र.X050451ते X050602 )कला (X086537 ते X086776) वाणिज्य (X109709 ते X109808) असे एकूण ४९० परीक्षार्थींची बैठक व्यवस्था करण्यात आली आहे.
बारावी बोर्ड परीक्षेच्या दृष्टीने सर्व तयारी अंतिम टप्प्यात आली असल्याची माहिती श्रीदत्त कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य तथा केंद्र संचालक श्री आर जे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना दिली .
यावेळी बोलताना श्री पाटील म्हणाले विद्यार्थ्यांनी तणावपूर्ण वातावरणामध्ये येऊ घातलेल्या बारावी बोर्ड परीक्षेला सामोरे जावे कॉपीमुक्त केंद्र म्हणून श्रीदत्त कनिष्ठ महाविद्यालयाची ओळख आहे. याच अनुषंगाने कोणताही अनुचित प्रकार या केंद्रावर होऊ नये या दृष्टीने सर्व तयारी करण्यात येत आहे परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांना प्रवास पिण्याचे पाणी वैद्यकीय सुविधा बैठक व्यवस्था याची सोय करण्यात आली आहे या दृष्टीने संबंधित विभागाशी पत्रव्यवहार करून सुविधा पुरवणीच्या दृष्टीने पावले उचलली गेली आहेत . विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या काळात प्रवेश पत्र ,लिखाण साहित्य ,ओळखपत्र यासारखे साहित्य सोबत आणावयाचे आहे .परीक्षा केंद्रावर प्रवेश यावेळी विद्यार्थ्यांची पूर्ण तपासणी करून प्रवेश दिला जाणार आहे. यामध्ये स्मार्ट वॉच ,मोबाईल व अन्य कॉपी संबंधित कोणतेही उपकरण व कागदपत्रे आढळल्यास प्रवेश दिला जाणार नाही. विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या काळात आहार, पाणी, झोप पुरेपूर घेणे गरजेचे आहे .आरोग्य विषयी समस्या असल्यास संबंधित केंद्र संचालक यांच्याशी संपर्क करून पूर्वकल्पना द्यावयाची आहे .कोणत्याही प्रकारचा ताण-तणाव न घेता परीक्षा देण्याचा प्रयत्न विद्यार्थ्यांनी करावा असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच बारावी बोर्ड परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. या परीक्षा केंद्रावर केंद्र संचालक श्री आर जे पाटील, उपकेंद्र संचालक श्री एस डी भोजे, स्टेशनरी सुपरवायझर श्री एस डी मस्कर हे काम पाहणार आहेत. दक्षता समिती स्थापन करण्यात आली आहे.
या बोर्ड परीक्षेच्या काळात सर्व शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी केंद्र संचालक यांच्या मार्गदर्शनाखाली परीक्षा सुरळीत पार पाडण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणार आहेत.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा