संत नामदेव शिंपी समाजाच्या कोल्हापूर जिल्हाध्यक्षपदी सुरेश पुकाळे यांची निवड
जयसिंगपूर / शिवार न्यूज नेटवर्क :
संत नामदेव शिंपी समाजाच्या कोल्हापूर जिल्हाध्यक्षपदी सुरेश पुकाळे यांची निवड करण्यात आली. अखिल भारतीय नामदेव क्षत्रिय महासंघ दिल्लीचे राष्ट्रीय अध्यक्ष भास्कराव टोम्पे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विशेष बैठकीत त्यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली.
या वेळी राष्ट्रीय कार्याध्यक्ष ईश्वर धिरडे, राष्ट्रीय प्रमुख समन्वयक अनंत जांगजोड, सांगली जिल्हाध्यक्ष उदय मुळे, संतोष मुळे आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीत समाजाच्या विविध प्रश्नांवर चर्चा झाली तसेच भविष्यात समाजहितासाठी राबवायच्या उपक्रमांबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.
निवडीनंतर सुरेश पुकाळे यांनी आपल्या प्रतिक्रिया देताना सांगितले की, "समाजाच्या प्रगतीसाठी मी पूर्ण ताकदीने काम करणार आहे. शिक्षण, व्यवसाय आणि सामाजिक ऐक्य वाढवण्यासाठी विशेष योजना आखल्या जातील." या निवडीमुळे कोल्हापूर जिल्ह्यातील नामदेव शिंपी समाजात आनंदाचे वातावरण असून, अनेक ठिकाणी सुरेश पुकाळे यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा